ETV Bharat / state

धारावीत नवे 36 कोरोनाबाधित, रुग्ण वाढीचे प्रमाण मात्र स्थिर

धारावीत आठवड्याभरापूर्वी रोज ५०हून अधिक रुग्णांची नोंद होत होती. ही आकडेवारी आता घटत आहे. बुधवारी येथे १८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. गुरुवारी ही आकडेवारी दुप्पट झाली असली तरी ५० च्या पुढे गेलेली नाही.

धारावी कोरोना
धारावी कोरोना
author img

By

Published : May 28, 2020, 9:57 PM IST

मुंबई - कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटत आहे. त्यामुळे धारावीकरांना दिलासा मिळाला आहे. आठवड्याभरापासून ही संख्या स्थिर झाली आहे. गुरुवारी येथे ३६ नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत येथील रुग्णांची संख्या १,६७५ वर पोहचली आहे.

धारावीत आठवड्याभरापूर्वी रोज ५०हून अधिक रुग्णांची नोंद होत होती. ही आकडेवारी आता घटत आहे. बुधवारी येथे १८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. गुरुवारी ही आकडेवारी दुप्पट झाली असली तरी ५० च्या पुढे गेलेली नाही. गेल्या सात ते आठ दिवसांपासून २५ ते ३५ पर्यंत रुग्णांची संख्या स्थिर राहिली आहे. घटणारी ही आकडेवारी धारावीकरांना दिलासा देणारी आहे.

गुरुवारी दिवसभरात सापडलेले रुग्ण मेघवाडी, कामराजनगर, मुस्लीमनगर, मुकुंदनगर, कुंभारवाडा, म्युनिसीपल चाळ, कृशनामेन मार्ग, जयगणेश चाळ, पीएमजीपी चाळ, राजीवगांधी नगर फातिमा चाळ, कामदेव नगर, मोहमद चाळ, कमला नगर जमदास मेन्शन, चौगुले चाळ, चंदा मार्केट, नीलकमल बिल्डिंग, धारावी कोळीवाडा या परिसरातील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.