ETV Bharat / state

भिवंडीत 'तिहेरी तलाक' चा तिसरा गुन्हा दाखल - thane

पीडितेची आई तिला माहेरी घेऊन जाण्याकरता आली होती. तेव्हा घरातून निघताना आरोपी पतीने तिला पुन्हा तीन वेळा 'तलाक-तलाक-तलाक' बोलून लग्नात दिलेले दागिने काढून घेत तिला मारहाण व शिवीगाळ केली आणि माहेरी हाकलून दिले. याप्रकरणी पीडितेने पती शारिक अफजल शेख याने बेकायदेशीर तलाक देणे व सासू, दोनही दिर व जाऊ या सासरच्या मंडळीने संगनमत करून हुंड्याकरता शारीरिक व मानसिक छळवणूक केल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

tripple talak bhiwandi
प्रतिकात्मक
author img

By

Published : Feb 16, 2020, 12:45 PM IST

ठाणे - भिवंडी शहरात 'तिहेरी तलाक' चा तिसरा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी पीडित महिलेच्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडीतील चव्हाण कॉलनी परिसरात राहणारी शर्मिक शेखचा (वय २२) १४ फ्रेबुवारी २०१९ रोजी शहरातील मानपाडा परिसरातील शुभारंभ कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्या शारिक अफजल शेख याच्याशी विवाह झाला होता. मात्र, लग्नात हुंडा दिला नाही म्हणून गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सासरची मंडळी पीडितेचा छळ करीत होती. दरम्यानच्या काळात पीडितेच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्या नातेवाईकांकडून ३० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर, दुचाकी व घर घेण्यासाठी वारंवार तिच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्याने चिडलेल्या सासरच्या मंडळींनी तिला रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी दिली होती. तसेच दोन वेळा जबरदस्तीने रॉकेलही पाजले होते.

खळबळजनक बाब म्हणजे, ही घटना तिच्या घरच्यांनाही कळू नये तसेच, पोलीस ठाण्यात तक्रारही करू नये म्हणून सासरच्यांनी तिच्यावर दबाव आणला होता. दरम्यान, ईद सणाकरीता पीडिता माहेरी आली असतांना पतीने तिला फोनवरून घरी येणार आहे का ? असे विचारले असता, तिने पतीला नकार दिला. याच गोष्टीचा राग येऊन पतीने फोनवर पत्नीला तीन वेळा 'तलाक-तलाक-तलाक' म्हटले. त्यानंतर पीडित पत्नीच्या आईने जावयाची समजूत काढल्याने पीडिता पुन्हा सासरी नांदण्यास गेली. मात्र, त्यानंतर सासरची मंडळी तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे तिने आईला कळविले. त्यानंतर, तिची आई तिला माहेरी घेऊन जाण्याकरिता आली होती. तेव्हा घरातून निघतांना आरोपी पतीने तिला पुन्हा तीन वेळा 'तलाक-तलाक-तलाक' बोलून लग्नात दिलेले दागिने काढून घेत तिला मारहाण व शिवीगाळ केली आणि माहेरी हाकलून दिले. याप्रकरणी पीडितेने पती शारिक अफजल शेख याने बेकायदेशीर तलाक देणे व सासू, दोनही दिर व जाऊ या सासरच्या मंडळीने संगणमत करून हुंड्याकरीता शारीरिक व मानसिक छळवणूक केल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार भा.द.वि.क ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४, सह मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी चितळसर मानपाडा पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिका निवडणूक: 'भाजप मनसेसोबत जाणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.