ETV Bharat / state

कोट्यवधींचा खर्च करूनही गाव तहानलेलेच ! पायपीट करीत भागवितात तहान - Water scarcity news

मुरबाड तालुक्यातील धसरई पासून अवध्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवत गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. या गावातील पाम्याची टंचाई दूर करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी सरकारने खर्च केला आहे. तरीही गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

there-is-water-scarcity-in-the-village-despite-spending-billions-of-funds
कोट्यवधींचा निधीचा खर्च करूनही गाव तहानलेलच
author img

By

Published : Jan 6, 2020, 8:35 PM IST

ठाणे - मुरबाड तालुक्यातील धसरईपासून अवध्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवत गावात पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन महिलांना लेकराबाळांसह २ ते ३ किमी पायपीट करावी लागते. या गावातील ग्रामस्थ ड्रमच्या गाडीच्या सहाय्याने पायपीट करत तहान भागवत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. देशातील एकमेव कॅशलेस गावात व आजूबाजूच्या गाव, पाड्यात पाणीपुरवठा योजनेवर लोखोंचा निधी देण्यात आला आहे.

कोट्यवधींचा निधीचा खर्च करूनही गाव तहानलेलच

मुरबाड तालुक्यातील मांडवत गावात हिवाळ्यातच पाणीटंचाईला सुरुवात झाल्याने गावानजीक असलेल्या विहिरिने तळ गाठायला सुरूवात केली आहे. त्यामुळे विहिरीचे पाणीही कधी कधी गावकऱ्यांना मिळत नाही. यामुळे गावातील ग्रामस्थांना नदीचा आधार घ्यावा लागत आहे. नदी गाठायला सुमारे तासभार लागत आहे. अशा परिस्थितीत गावाकडे कोण लक्ष देईल असा सवाल उपस्थित झाल आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, या भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईने किती हाहाकार उडाला आहे. पंचक्रोशीतील गावांना दोन ते तीन वर्षापासून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या गावामध्ये इतकी भीषण पाणीटंचाई असतांना प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा ही केला जात नाही, हे दुर्दैव आहे.

मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई ही आदिवासीच्या पाचवीलाच पुजली असल्याने मुरबाडमधील अनेकगाव- पाड्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकंदरीतच आदीवासी पाड्या, वस्तीमध्ये पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात शासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

Intro:kit 319Body:(विशेष) कोट्यवधींचा निधीचा खर्च करूनही गाव तहानलेच ! पायपीट करीत भागवितात तहान

ठाणे: मुरबाड तालुक्यातील धसई पासून अवध्या ५ किलोमीटर अंतरावर असेलेल्या मांडवत गावात पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन महिलांना लेकराबाळासह २ ते ३ किमी तर काही ग्रामस्थ ड्रमच्या गाडीने पायपीट करीत त्यांना तहान भागवावी लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
विशेष म्हणजे मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. विशेषतः देशातील एकमेव कॅशलेस गावात व आजूबाजूच्या गाव,पाड्यात पाणीपुरवठा योजनेवर लाखोंचा निधी दिला आहे.
मुरबाड तालुक्यातील मांडवत गावात हिवाळ्यातच पाणीटंचाईला सुरुवात झाल्याने गावानजीक असलेल्या विहिरिने तळ गाठायला सुरवात केल्याने या विहिरीचं पाणीही कधी कधी गावकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे नदीचा आधार घ्यावा लागत असून पाणी आण्यासाठी ही नदी गाठायला सुमारे तासभर लागतो, अश्या परिस्तितीत या गावाकडे कोण लक्ष देईल असा सवाल उपस्थित झाला असून यावरून आपण अंदाज लावू शकता कि, या भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईने किती हाहाकार उडाला आहे. तर पंचक्रोशीतील गावांना दोन ते तीन वर्षापासून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या गावामध्ये इतकी भीषण पाणीटंचाई असतांना प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा ही केला जात नाही हे दुर्दैव आहे.
दरम्यान, मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई ही आदिवासीच्या पाचवीलाच पुजली असल्याने मुरबाडमधील अनेकगाव- पाड्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.एकंदरीतच आदीवासी पाड्या, वस्तीमध्ये पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात शासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

Conclusion:murbad
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.