ETV Bharat / state

आचारसंहितेमुळे सानुग्रह अनुदानाला ग्रहण; भिवंडी महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात - ठाणे बातमी

राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भिवंडी शहर निजामपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी पालिका प्रशासनाने कामगार कर्मचारी संघर्ष कृती समिती सोबत 16 सप्टेंबरला बैठक आयोजित केली होती.

आचारसंहितेमुळे सानुग्रह अनुदानाला ग्रहण
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:19 PM IST

ठाणे - भिवंडी निजामपूर शहर महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान दरवर्षी दिले जाते. मात्र, आजच आचारसंहिता लागल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाला ग्रहण लागले आहे. तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात काढावी लागणार आहे. येत्या काही दिवसात कर्मचारी व पालिका प्रशासन यांच्यामधील संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

आचारसंहितेमुळे सानुग्रह अनुदानाला ग्रहण

हेही वाचा- यावेळी राज्यात परिवर्तन होईल, नवाब मलिकांना विश्वास

राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भिवंडी शहर निजामपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी पालिका प्रशासनाने कामगार कर्मचारी संघर्ष कृती समिती सोबत 16 सप्टेंबरला बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली बारा हजार पाचशे रुपयांची रक्कम देण्यास पालिका प्रशासनाने नकार देऊन 7 हजार 500 रुपये देण्यावर ठाम राहिले. या वादामुळे बैठक फिस्कटली, त्यानंतर पाच दिवसांचा कालावधी उलटूनही पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर तोडगा काढण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्यातच शनिवारी दुपारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला आता कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात कायदेशीर अडचणी निर्माण होणार असल्याने या वर्षी तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. पालिका प्रशासनाच्या बेफिक्रीपणामुळे कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार असल्याने येत्या काळात पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये अनुदानासाठी संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:kit 319

Body:आचारसंहितेमुळे सानुग्रह अनुदानाला ग्रहण ; भिवंडी महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

ठाणे : भिवंडी निजामपुर शहर महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान दरवर्षी दिले जाते , मात्र आजच आचारसंहिता लागल्यामुळे कर्मचाऱ्यांचा सानुग्रह अनुदानाला ग्रहण लागल्याने तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात काढावी लागणार असून येत्या काही दिवसात कर्मचारी व पालिका प्रशासन यांच्यामधील संघर्ष पहावयास मिळणार आहे,

राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भिवंडी शहर निजामपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने कामगार कर्मचारी संघर्ष कृती समिती सोबत 16 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली बारा हजार पाचशे रुपयांची रक्कम देण्यास पालिका प्रशासनाने नकार देऊन 7 हजार 500 रुपये देण्यावर ठाम राहिले, या वादामुळे बैठक फिस्कटली, त्यानंतर पाच दिवसांचा कालावधी उलटूनही पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावर तोडगा काढण्यात स्वारस्य दाखवले नाही, त्यातच शनिवारी दुपारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे पालिका प्रशासनाला आता कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात कायदेशीर अडचणी निर्माण होणार असल्याने या वर्षा तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे, पालिका प्रशासनाच्या बेफिक्रीपणामुळे कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहणार असल्याने येत्या काळात पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये अनुदानासाठी संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे,

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.