ETV Bharat / state

Thane Crime : दोन ज्वेलर्स दुकानांचे शटर तोडून चोरटयांनी केले लाखोंचे दागिने लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद - Theft in two jewellers shops in Dombivvali Pune

चोरट्यांनी एकच वेळी दोन ज्वेलर्सच्या दुकानांचे शटर तोडून दुकानांतील लाखो रुपयांचे सोने, चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिम भागातील सराफाच्या दुकानात घडली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर घेऊन गेले. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Crime
ठाण्यात दोन ज्वेलर्समध्ये चोरी
author img

By

Published : Jan 19, 2023, 6:41 PM IST

ठाण्यात दोन ज्वेलर्समध्ये चोरी

ठाणे : मिळालेल्या माहितीनुसार जबरदास वैष्णव यांचे डोंबिवली पश्चिम भागातील चिंचोड्याचा पाडा परिसरात श्री बालाजी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. तर याच भागातील कर्वे रस्त्यावर भागशाळा मैदान भागात राहणाऱ्या नारायण रायकर यांचे रायकर ज्वेलर्स आहे. दोन्ही दुकाने वर्दळीच्या रस्त्यावर आहेत. चोरट्यांनी आज (गुरुवारी ) पहाटे तीन ते पाच वाजताच्या सुमारास दुकानांचे शटर फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर १३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लुटून पोबारा केला. विशेष म्हणजे आपली ओळख पोलिसांना पटू नये म्हणून चोरट्यांनी सराफांच्या दुकानातील सीसीटीव्ही, डीव्हीआर चोरट्याने पळवला आहे.

चोरीविषयी आश्चर्य : दुकान मालक जबरदास वैष्णव, नारायण रायकर हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करुन घरी गेले. दरम्यानच्या काळात पहाटेच्या वेळेत चोरट्यांनी दुकानाची मुख्य प्रवेशद्वारे लोखंडी कटावणीने फोडून आतील लोखंडी जाळ्या तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ऐवज, सव्वा लाखाची रोख रक्कम लुटून पलायन केले. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुकाने आहेत. रिक्षा, पादचाऱ्यांची पहाटे वर्दळ असते. अशा परिस्थितीत चोरट्यांनी या भागात चोरीचे धाडस केल्याने दुकानदारांनी आश्चर्य व्यक्त केले.

आरोपींचा शोध सुरू : विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी तपास पथके तयार करुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी दावडी भागात एका जवाहिऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला होता. डोंबिवलीतील वाढत्या भुरट्या, घरफोड्यांमुळे नागरिक, व्यापारी हैराण आहेत. एकाच रात्रीत दोन सराफांची दुकाने फोडल्याने सराफांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोना महासाथीच्या दोन वर्षांत सराफ व्यवसाय मंदीत आहे. आता कुठे व्यवसाय उभारी घेत आहे. विवाह सोहळ्यांचा हंगाम चालू आहे. त्यात ही चोरी झाल्याने दोन्ही दुकानांच्या मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : Buldhana Crime : सोयबीन कट्टे चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात; २ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.