ETV Bharat / state

Traffic Park In Thane : ठाण्यातील ट्राफिक पार्क झाले खासगी संस्थांच्या उत्पन्नाचे साधन

१६ करोड रुपये खर्च करून निर्मण केलेल्या थीम पार्कच्या (Theme park) दुरावस्था नंतर आता, ९ करोड खर्च करून उभारण्यात आलेले ट्राफिक पार्क (Traffic Park In Thane) ही धूळ खात पडल्याचे समोर आले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे विदार्थाना वाहतुकीचे नियम कळावे व त्यांना मोफत वाहन शिकता यावे म्ह्णून ठाणे पालिकेने या पार्कची स्थापना केली असताना मात्र या ठिकणी एक खाजगी संस्था वाहन शिकवण्यासाठी हजारो रुपये लाटत (source of income for the Private Institution) असल्याचे चित्र आहे.

Thane Municipal Corporation
ठाणे महापालिका
author img

By

Published : Feb 11, 2022, 7:36 PM IST

ठाणे: निवडणुका आल्या कि अनेक प्रकल्पा चे उदघाटन होतात. शहरातील वास्तूंचे लोकार्पण सोहळे पार पडतात. आणि नंतर याकडे कोणी पाहतही नाही. आणि मग सर्वसामांन्यांच्या करोडो रुपयांचा चुराडा होताना पहायला मिळतो असेच घडतेय ठाण्यात. ठाण्याचा इतिहास व ठाण्यातील महत्वाच्या वास्तू एकाच मांडवा खाली पाहता याव्या यासाठी १६ करोड रुपये खर्च करून घोडबंदर रोड वर जुने ठाणे नवे ठाणे या थीम पार्कची (Theme park) निर्माती करण्यात आली. २०१८ साली याचे मोठ्या धुमधडाक्यात उदघाटन करण्यात आले होते. परंतु आता या ठिकाणी सर्वच कोलमोडले दिसत आहे, सगळीकडे दुरावस्थाचेचे साम्राज पाहायला मिळत आहे. असेच काहीसे ट्राफिक पार्क (Traffic Park In Thane) संदर्भातही घडलेय. लहान मुलांना व विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावे, यांना मोफत वाहन शिकायला मिळावे, या उद्देशाने ट्राफिक पार्कची स्थापना करण्यात आली, जवळपास ९ करॊड रुपये खर्च करून २०१८ ला याचे उदघाटन करण्यात आले. परंतु आता हे पार्क धूळ खात पडले आहेत. येथील सर्व वस्तूंची दुरावस्था झालीय. गेली दोन वर्ष या ठिकणी कोणी फिरकलेच नाही. तर धक्कादायक प्रकार म्हणजे. वाहतुकीचे नियम कळावे व त्यांना मोफत वाहन शिकता यावे म्ह्णून ठाणे पालिकेने याची स्थापना केली असताना या ठिकणी एक खाजगी संस्था वाहन शिकवण्यासाठी हजारो रुपये लाटत आहे असा खुलासा भाजप गटनेता मनोहर डुंबरे यांनी केलाय एवढी मोठी वास्तू आहे तिची जोपासना व्हावी व जे लुबाडण्याचा प्रकार सुरु आहेत ते लगेच बंद व्हावे अशी मागणी डुंबरेनी केली आहे. या पार्क मध्ये पालिका क्षेत्रात नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतो पण या प्रकल्पामुळे खासगी व्यवसाय करणाऱ्या संस्थांचे चांगभले झाले आहे. आता ठाण्यातील सर्व सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि त्यांच्या करातून खासगी संस्था स्वतः चा फायदा करत आहेत हे प्रकार रोखले पाहिजेत अशी भूमिका घ्यावी असे आवाहन भाजप ने केले आहे.

हेही वाचा: Waiting For Help: कोरोनाने आईवडलांपासून पोरके झालेल्या मुलांना मदतीची प्रतिक्षाच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.