ETV Bharat / state

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही आरोग्य सेवेच्या भरतीसाठी इच्छुकांची लाट

author img

By

Published : May 1, 2021, 4:41 PM IST

कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात आरोग्य यंत्रणेत आवश्यक असलेल्या विविध 120 पदांसाठी भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे घेण्यात आली. यावेळी अनेक इच्छुक तरुण-तरुणींनी गर्दी केल्याचे दिसून आले. लॉकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली आहे. त्यामुळे यावेळी झालेल्या गर्दीमुळे बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आले.

thane
ठाणे

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक हजाराच्यावर रुग्ण महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केली जात आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेत आवश्यक असलेल्या विविध 120 पदांसाठी महापालिका मुख्यालयात भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे घेण्यात आली. मात्र 120 पदांसाठी शेकडो इच्छुक तरुण-तरुणींनी एकच गर्दी केल्याचे दिसले. कोरोनाच्या काळातही भरती लाट आल्याचे पाहावयास मिळत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील आरोग्य सेवक भरतीसाठी इंच्छुकांची गर्दी

बेरोजगारीचे भयाण वास्तव

गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात लाखो तरुण-तरुणींनी आपले रोजगार गमावले आहेत. आता तर जीवावर उदार होऊन बेरोजगार तरुण-तरुणी रोजी-रोटीसाठी भटकंती करताना दिसत आहेत. त्यातच कोरोनाच्या काळात कल्याण-डोंबिवली महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली. या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या तरुण- तरुणांची गर्दी पाहता बेरोजगारीचे भयान वास्तव प्रत्यक्षात दिसले. महापालिकेने सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करीत भरती प्रक्रिया सुरू केली होती. दुसरीकडे भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेकांकडे सर्व कागदपत्रे नसल्याने परत जावे लागले. तर लॉकडाऊनमुळे झेरॉक्सची दुकाने बंद असल्याने या उमेदवारांची मोठी पंचाईत झाली होती.

भरती प्रक्रियेसाठी तरुणींचा उत्तम प्रतिसाद

कोरोना रोखण्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने रुग्णालयीन सेवेसाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली. यात वैद्यकीय अधिकारी, आयुष्य वैद्यकीय अधिकारी, याप्रमाणे कंत्राटी तत्त्वावर 34 जागा; सिस्टर इन्चार्ज 1 जागा, ईसीजी टेक्निशियन 8 जागा, स्टॉफ नर्स 59 जागा, सहाय्यक परिचारिका 16 जागा, लॅब टेक्निशियन 2 जागा अशी एकूण 120 जागांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया गुरुवारी व शुक्रवारी थेट मुलाखतीच्या माध्यमातून घेण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी विशेषत: तरुणींचा उत्तम प्रतिसाद दिसून आला.

हेही वाचा - मुंबईत सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

हेही वाचा - मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लता मंगेशकर सरसावल्या; सात लाखांची केली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.