ETV Bharat / state

ठाणे : कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक केणी यांचा मृत्यू, कोरोनाशी देत होते झुंज - corona update news

कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मुकुंद केणी यांचा मृत्यू झाला. ते मागील 14 दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत होते.

mukund keni
मृत नगरसेवक मुकुंद केणी
author img

By

Published : Jun 10, 2020, 11:10 AM IST

ठाणे - राष्ट्रवादीचे कळव्याचे नगरसेवक मुकुंद केणी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 14 दिवस ते मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. पण, त्यांना मधुमेहाचा देखील त्रास होता, तसेच रक्तदाबाचाही त्रास त्यांना जाणवत होता. त्यामुळे गेल्या 14 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. डॉक्टरांचे देखील शर्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतु त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि केणी यांचा मृत्यू झाला.

मुकुंद केणी हे कळव्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. सलग दुस:यांदा त्यांनी नगरसेवक पद भुषविले होते. अतिशय शांत, मनमिळावू स्वभाव सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. देशभरात कोरोनाची लागण झाल्यानंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत होते. कळव्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती. त्यात कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने अनेक गोर गरीब नागरिकांचे हाल सुरू होते. अशातच संपूर्ण केणी कुटुंब या नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले होते.

पहिल्या दिवसापासून अगदी आतार्पंयत त्यांच्याकडून प्रत्येकाला मदतीचा ओघ सुरुच होता. त्यातच एखाद्याची टेस्ट केली जात नसेल, एखाद्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नसेल तर केणी हे स्वत: रुग्णालयात जात होते. अशाच प्रकारे नुकतेच कळवा रुग्णालयात एकाला दाखल करण्यासाठी ते गेले होते.

त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना ताप येऊ लागला, तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यामुळे लागलीच त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्यांना घोडबंदर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पण, दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

मागील 14 दिवस ते व्हेटिंलेटरवर होते. त्यात त्यांना मधुमेहाचा आणि रक्तदाबाचाही त्रास होता. त्यामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, मागील 14 दिवस त्यांचा कोरोनाशी लढा सुरू होता. अखेर मंगळवारी (दि.9 जून) रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि एक नातू असा परिवार आहे.

ठाण्यात नगरसेवकाचा दुसरा बळी

मागील आठवड्यात भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मुकुंद केणी यांच्या निधनामुळे ठाण्यात दोन नगरसेवकांना या कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! अंबरनाथच्या माजी उपनगराध्यक्षांचा उपचारांअभावी मृत्यू!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.