ETV Bharat / state

ठाण्यात हायवेवर शुकशुकाट, कारवाईच्या भीतीने रस्ते झाले मोकळे - thane traffic jam

गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आज (मंगळवारी) रस्त्यांवर गर्दी कमी प्रमाणात दिसून येत आहे. नेहमीच वाहतूक कोंडी होणाऱ्या मुलुंडच्या आनंदनगर टोल नाका इथे देखील सकाळपासून अतिशय कमी वाहने आल्याने आज वाहतूक कोंडी झाली नाही.

Thane traffic
ठाण्यात हायवेवर शुकशुकाट.. कारवाईच्या भीतीने रस्ते झाले मोकळे
author img

By

Published : Jun 30, 2020, 2:48 PM IST

ठाणे - गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आज (मंगळवारी) रस्त्यांवर गर्दी कमी प्रमाणात दिसून येत आहे. नेहमीच वाहतूक कोंडी होणाऱ्या मुलुंडच्या आनंदनगर टोल नका इथे देखील सकाळपासून अतिशय कमी वाहने आल्याने आज वाहतूक कोंडी झाली नाही. काल याच ठिकाणी एक ते दीड किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबईमध्ये प्रवेश करताना मुंबई पोलीस चौकशी करूनच मुंबईचा सोडत असल्याने काल (सोमवारी) अनेक वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्याचा धाक म्हणून की काय आज अनेकांनी अनावश्यक करण्यासाठी बाहेर येणे टाळले. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी प्रमाणात दिसून आली.

देशभरातील कोरोना परिस्थिती -

कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 18 हजार 522 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 418 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 16 हजार 475 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील 3 लाख 21 हजार 722 लोक कोरोनामुक्त झाले असून सध्या 2 लाख 15 हजार 125 जणांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.