ETV Bharat / state

Minor Girl Rape Case : 16 वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार; आरोपीला सात वर्षांची शिक्षा

भिवंडीतील खाडीपार भागातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला ( Minor Girl Rape Case In Bhiwandi ) होता. याप्रकरणी आता ठाणे पोक्सो न्यायालयाने आरोपीला सात वर्षाची शिक्षा सुनावली ( Posco Court Man Gets 7 Year Jail ) आहे.

court
court
author img

By

Published : Apr 18, 2022, 9:09 PM IST

ठाणे - भिवंडीतील खाडीपार भागातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर टेकडी भागातील एका खोलीत डांबून ठेवत दोन दिवस बलात्कार करण्यात ( Minor Girl Rape Case In Bhiwandi ) आला होता. याप्रकरणी आरोपीला विशेष पोक्सो ठाणे न्यायालयाने शनिवारी ( 16 एप्रिल ) अंतिम निकाल देत सात वर्षांचा तुरुंगवास आणि ८ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली ( Posco Court Man Gets 7 Year Jail ) आहे. सद्दाम उर्फ गुड्डू इस्त्राइल अन्सारी ( वय, ३१ रा. भिवंडी ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अपहरण करून बलात्कार - पीडित मुलगी भिवंडीतील खाडीपार परिसरात राहते. १७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी कपडे शिवण्याचा लागणारा धागा खरेदीसाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी आरोपी सद्दामने तीला बहाण्याने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर तिला भंडारी कंपाऊंडच्या पलीकडे असलेल्या टेकडीवरील एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने दोन दिवस बलात्कार केला. पीडित मुलगी १७ एप्रिलपासून घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शोध सुरु केला. त्यातच पीडितेच्या नातेवाईकांनी १८ एप्रिल रोजी आरोपीच्या घरी पोहोचून दरवाजाचे कुलूप तोडले असता पीडित मुलगी त्या बंदिस्त खोलीत असल्याचे आढळून आली. त्यानंतर नातेवाईकांनी तिची सुटका करून तिला घरी आणले. त्यावेळी तिने घडलेला प्रसंग नातेवाईकाला सांगितला. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला त्याच दिवशी अटक - गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक एस. बी म्हके यांच्यासह पथकाने १८ एप्रिल रोजी भिवंडीतून आरोपीला अटक केली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी पीडितेच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्याची गरज असल्याचे न्यायाधीशांना सांगितले. त्यानंतर न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी आरोपीला सात वर्षाची शिक्षा आणि आठ हजारांचा दंड ठोठावला आहे.

याप्रकरणी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी म्हटलं की, आरोपीला भादंवि कलम ३७६ (बलात्कार), ३६३, (अपहरण) आणि ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिवास) अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे.

हेही वाचा - Minor Daughter Rape Case : मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्याला पाच वर्षांची शिक्षा; आरोपीचा न्यायालयात धक्कादायक युक्तीवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.