ETV Bharat / state

वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी अनोखी युक्ती; ठाणेकर लावत आहेत स्वत:चा जॅमर - वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक

ठाणे महानगरपालिका हद्दीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येने १० लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही वाहने उभी करण्यासाठीचे पुरेसे नियोजन मात्र शहरात नाही. नो पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केल्यास वाहतूक विभागाकडून जॅमर लावून कारवाई करण्यात येते.

vehicle jammer
वाहनांना खासगी जॅमर
author img

By

Published : Nov 27, 2019, 11:07 PM IST

ठाणे - रस्ते, इमारतींच्याकडेला बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालकांनी नवीन शक्कल लढवली आहे. अनधिकृत ठिकाणी वाहन उभे केल्यानंतर हे चालक स्वत:जवळील ‘जॅमर’ चाकांना लावतात. गाडीला ‘जॅमर’ लागल्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या वाहनावर कारवाई झाल्याचा समज होतो. त्यामुळे ते कारवाई करत नाहीत. अशा प्रकारच्या ‘जॅमर’द्वारे ठाणेकर पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.

वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी अनोखी युक्ती

ठाणे महानगरपालिका हद्दीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येने १० लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही वाहने उभी करण्यासाठीचे पुरेसे नियोजन मात्र शहरात नाही. नो पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केल्यास वाहतूक विभागाकडून जॅमर लावून कारवाई करण्यात येते. वाहतूक विभागाच्या या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालक वाहनाला खासगी जॅमर लावतात.

हेही वाचा - दादांच्या बंडानंतर सुप्रिया ताईंचे वाढले महत्व

लाल-पिवळ्या रंगाचे हे जॅमर वाहतूक शाखेकडे असलेल्या जॅमरप्रमाणे आहेत. या जॅमरची विक्री सुमारे दीड हजार रुपयांना होत आहे. लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट परिसरातील अनेक भागात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांना असे दिशाभूल करणारे जॅमर लावण्यात येत आहेत.
माजीवडा येथील फ्लॉवर व्हॅली आणि वंदना सिनेमा गृहाजवळ असे जॅमर लावून मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात आहेत. यातील अनेक वाहने विक्रीसाठी ठेवलेली असतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.

वाहतूक विभागाच्या जॅमरवर आम्ही विशिष्ट सांकेतिक क्रमांक नमूद केलेला आहे. हे जॅमर लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मात्र, वाहतूक विभागाच्या जॅमरशी साधर्म्य असलेले जॅमर वाहनांच्या चाकाला लावण्याचे प्रकार वाहनचालकांकडून होत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Intro:ठाणेकर स्वतःचा जैमर लावून करत आहेत वाहतूक पोलिसांची फसवणूक कारवाई टाळण्यासाठी अनोखी युक्तीBody: रस्ते, इमारतींच्या कडेला बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालकांनी आता नवी शक्कल लढवली आहे. अनधिकृत ठिकाणी वाहन उभे केल्यानंतर हे चालक स्वत:जवळील ‘जॅमर’ चाकांना लावून खुशाल आपल्या कामाला रवाना होतात. गाडीला ‘जॅमर’ लागल्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या वाहनावर कारवाई झाल्याचे वाटते आणि ते कारवाई करत नाहीत. अशा प्रकारे ‘जॅमर’द्वारे पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक सुरू आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या शहरांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येने १० लाखांचा आकडा केव्हाच ओलांडला असून ही वाहने उभी करण्यासाठीचे पुरेसे नियोजन मात्र शहरात नाही. शहरात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहने धावत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत मार्गासह मुख्य मार्गावर नियमावलीनुसार नो पार्किंगची ठिकाणे आणि वेळांचे नियोजन वाहतूक विभागाकडून ठरवण्यात आले आहे. या नो पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केल्यास वाहतूक विभागाकडून जॅमर लावून कारवाई करण्यात येते. वाहतूक विभागाच्या या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालक वाहनाला खासगी जॅमरच लावून वाहन नो पार्किंगमध्ये उभे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लाल-पिवळ्या रंगाचे हे जॅमर वाहतूक शाखेकडे असलेल्या जॅमरप्रमाणे आहेत. या जॅमरची विक्रीही सुमारे दीड हजार रुपयांना होत आहे. वाहतूक विभागाकडून चारचाकी वाहनावर कारवाई दरम्यान वाहनाच्या चाकाला लावण्यात येणाऱ्या जॅमरप्रमाणेच हे हुबेहूब जॅमर बाजारात विकत मिळत आहेत. नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे कारवाई वाहन आल्यास अगोदरच नो पार्किंगमधील वाहनाला जॅमरलावले असल्यामुळे वाहतूक पोलिसांची दिशाभूल होऊन कारवाई करण्यात येत नाही. खासगी जॅमर वापरणाऱ्या वाहनचालक नो पार्किंगमधून वाहन काढायचे असल्यास पुन्हा किल्लीच्याद्वारे जॅमर चाकामधून काढता येते.लोकमान्यनगर, सावरकरनगर तसेच वागळे इस्टेट परिसरातील अनेक भागांत रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांना अशा प्रकारे कारवाई करणाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी बनावट जॅमर लावण्यात येत आहेत. माजीवडा येथील फ्लॉवर व्हॅली तसेच वंदना सिनेमा गृहाजवळ असे जॅमर लावून सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत आहेत. यातील अनेक वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आलेली असतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.वाहतूक विभागाच्या जॅमरवर आम्ही विशिष्ट सांकेतिक क्रमांक नमूद केलेला आहे. तसेच जॅमर लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मात्र वाहतूक विभागाच्या जॅमरशी साधम्र्य साधणारे जॅमर वाहनांच्या चाकाला लावण्याचे प्रकार वाहनचालकांकडून होत असतील आणि त्याद्वारे कारवाई टाळण्यासाठी दिशाभूल केली जात असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,तसेच या बाबत कारवाई सुरु केलीय असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात येतं आहे .

byte – अविनाश पालवे , सहआयुक्त वाहतूक पोलीस ठाणे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.