ETV Bharat / state

ठाण्यात एकनाथ शिंदेच्या आदेशाचे प्रशासनाकडून पालन; मात्र खड्डे बुजवण्यासाठी मातीचा वापर - ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे

खड्ड्यांमुळे टीका होत असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर महापालिकेने शुक्रवारी सकाळपासून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, ठेकेदारांनी माती आणि खडी टाकून रस्ते बुजवायला घेतले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस आल्यास हे काम किती टिकेल? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

खड्डे बुजवण्यासाठी मातीचा वापर
author img

By

Published : Sep 20, 2019, 9:28 PM IST

ठाणे - शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालेली आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० दिवसात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. त्याचे पालन देखील केले जात आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चक्क मातीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या खड्डे दुरुस्तीची पुन्हा पावसाळ्यात पार वाट लागणार आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या लाखो रुपयांचा चुराडा करण्याचा अधिकार पालिकेला कुणी दिला? असा सवाल केला जात आहे.

खड्डे बुजवण्यासाठी मातीचा वापर

दहा दिवसांत रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; एकनाथ शिंदेंसह रविंद्र चव्हाणांचा इशारा

पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर खड्डे पडणे नवीन नाही. मात्र, पावसाने उसंत घेतल्यावर तातडीने हे खड्डे बुजवणे आवश्यक असते. ठाणे महापालिका आणि जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजवण्यात न आल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. शिवाय वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांनाही रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे हे चेष्ठेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील भाजपने खड्ड्यांच्या छायाचित्रांची फ्रेम ठाणे महापालिका नगर अभियंता खडताळे यांना भेट देऊन अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. कल्याणमध्येही मनसेने खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन केले. खड्ड्यांमुळे विरोधक घेरणार असल्याने ठाण्यातील सत्ताधार्‍यांवर महासभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती.

ठाण्यात कंटेनर चढला दुभाजकावर; वाहनांच्या लांबच लांब रांगा

खड्ड्यांमुळे टीका होत असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नियोजन भवनात बैठक घेत नवरात्रीपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर ठाणे महापालिकेने शुक्रवारी सकाळपासून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, ठेकेदारांनी माती आणि अनेक ठिकाणी खडी आणि माती टाकून रस्ते बुजवायला घेतले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस आल्यास हे काम किती टिकेल? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. शिवाय अशा कामाने दुचाकीस्वार आणि इतर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हे खड्डे बुजवल्यानंतर लाखो रुपयांचे बिल निघणार आहेत. मात्र, रस्त्यांवरील खड्डे आहे तसेच राहणार असे चित्र आहे.

Intro:ठाण्यात पालकमंत्र्यांच्या आदेशाचे प्रशासनाकडून पालन मात्र खड्डे बुजवण्यासाठी मातीचा वापर हलगर्जीपणाचा कळसBody:

ठाणे शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहने चालवणे जिकीरीचे झाले आहे. रस्तोरस्ती खड्डेच खड्डे झाल्याने वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीच्या पूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्याचे तंतोतंत पालन शहरात होत असले तरी, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चक्क मातीचा वापर करण्यात येत आहे. अशा खड्डे दुरुस्तीने रस्ते जोरदार पावसात वाहून जाणारच आहे, शिवाय अपघात होण्याची शक्यता असल्याने भीक नको, पण कुत्रं आवर असे बोलण्याची वेळ ठेपली आहे.
पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर खड्डे पडणे नवीन नाही. पण पावसाने उसंत घेतल्यावर तातडीने हे खड्डे बुजवणे आवश्यक असते. ठाणे महापालिका आणि जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजवण्यात न आल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. शिवाय वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांनाही रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे हे चेष्ठेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे. काही दिवसापूर्वी ठाण्यातील भाजपने खड्ड्यांच्या छायाचित्रांची फ्रेम ठाणे महापालिका नगर अभियंता खडताळे यांना भेट देऊन अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. कल्याणमध्येही मनसेने खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन केले. खड्ड्यांमुळे विरोधक घेरणार असल्याने ठाण्यातील सत्ताधार्‍यांवर महासभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. खड्ड्यांमुळे चौखुर टीका होत असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नियोजन भवनात बैठक घेत, नवरात्रीपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश त्या त्या यंत्रणांना दिले. त्यानंतर ठाणे महापालिकेने शुक्रवारी सकाळपासून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. पण ठेकेदारांनी माती आणि अनेक ठिकाणी खडी आणि माती टाकून रस्ते बुजवायला घेतले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस आल्यास हे काम किती टिकेल, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. शिवाय अशा कामाने दुचाकीस्वार आणि इतर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हे खड्डे बुजवल्यानंतर लाखो रुपयांचे बिल निघणार आहेत, पण रस्त्यांवरील खड्डे आहे, तिथेच राहणार असे चित्र आहे. ठाणेकरांच्या लाखो रुपयांचा चुराडा करण्याचा अधिकार पालिकेला कुणी दिला असा सवाल केला जात आहे.
P2c manoj devkarConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.