ETV Bharat / state

Pariksha Pe Charcha: ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी झाले पंतप्रधानांच्या 'परीक्षा पे चर्चा'मध्ये सहभागी, मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती - Thane Municipal School students

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आणि मुख्यमंत्र्यांचा परिसर असलेल्या किसन नगर भागातील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले होते.

Pariksha Pe Charcha
विद्यार्थी झाले पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा'मध्ये सहभागी
author img

By

Published : Jan 27, 2023, 2:27 PM IST

ठाणे : महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद झालेला यावेळी पाहायला मिळाला. परीक्षा काळामध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा, याचे मार्गदर्शन यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्वच विद्यार्थ्यांना केले. याचा उपयोग आगामी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवेळेस विविध विषयांवर देशातील नागरिकांशी चर्चा करत असतात.

मुख्यमंत्र्यांच्या जुन्या घराजवळील शाळा : ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमधील हा लाईव्ह झालेला कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून पाहिला. त्यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर हेदेखील उपस्थित होते. ही महानगरपालिकेची शाळा मुख्यमंत्र्यांच्या जुन्या घराजवळील शाळा आहे. या शाळेमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय मतदानासाठी देखील येत असतात. या शाळेमध्ये पटसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या शाळेवर प्रशासनाचे बारीक लक्ष असते. या शाळेमधील सुविधा चांगल्या असल्यामुळेच या शाळेचे नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले.

विद्यार्थी सर्वच दृष्ट्या महत्त्वाचे : काही दिवसांवर परीक्षा आलेल्या आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांची संवाद साधून त्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी केली. परीक्षांना कशाप्रकारे सामोरे जायचे याचे मार्गदर्शन त्यांनी आज केले आहे. कोणतीही सरकारी योजना अमलात आणण्यासाठी विद्यार्थी हे महत्त्वाचे असतात. कारण विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन ते आपले कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणून सरकारकडून विद्यार्थ्यांना वारंवार मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न केले जातात. लहानपणी त्यांना शिकवलेल्या गोष्टी कायम स्मरणात राहतात, म्हणून विद्यार्थ्यांना सर्वांकडून मार्गदर्शन करण्यात येते.

पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद : 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तालकटोरा स्टेडियमवर पोहोचले होते. सर्वप्रथम त्यांनी स्टेडियममधील प्रदर्शनात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चर्चेला सुरुवात करताना पंतप्रधान म्हणाले की, 'परीक्षा पे चर्चा' ही माझीही परीक्षा आहे आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी परीक्षा घेत आहेत. ही परीक्षा देताना मला आनंद होतो. कुटुंबांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. परंतु केवळ सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्या अपेक्षा असतील तर ते धोकादायक आहे. मदुराईच्या अश्विनी यांनी आपला प्रश्न पीएम मोदींसमोर ठेवला. मुलांच्या मनातून परीक्षेची भीती घालवण्यासाठी पंतप्रधानांनी मंत्र दिला.

हेही वाचा: PM Modi Pariksha Pe Charcha : 'परीक्षा पे चर्चा' मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ही माझीही परीक्षा आहे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.