ETV Bharat / state

डोंगराळ भागातील नागरिकांना महापालिकेची नोटीस, सुरक्षीतस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन - ठाणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने, ठाणे पालिका प्रशासनाने ठाणे शहरातील डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच या नागरिकांना सुरक्षीतस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

डोंगराळ भागातील नागरिकांना महापालिकेची नोटीस

author img

By

Published : Jun 12, 2021, 6:39 PM IST

ठाणे - अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने, ठाणे पालिका प्रशासनाने ठाणे शहरातील डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच या नागरिकांना सुरक्षीतस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

खाडी किनाऱ्यावरील आणि नाल्याशेजारच्या झोपड्यांमध्ये मान्सून काळात पाणी शिरून जीवित आणि वित्तहानीचा धोका निर्माण होतो. ठाण्यातील लाखो नागरिक अशा धोकादायक स्थितीमध्ये नाईलाजास्तव राहत असून, सुरक्षीत निवारा नसल्याने लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आहे. अशा नागरिकांनी तात्काळ आपली घरे रिकामे करून सुरक्षीत निवारा शोधावा, अन्यथा अतिवृष्टीमुळे होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीला महापालिका जबाबदार राहणार नसल्याची नोटीस महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या या नोटीशीमुळे डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

अतिक्रमणामुळे दरड कोसळण्याचा धोका

ठाण्यातील मुंब्रा, कळवा, लोकमान्य-सावरकरनगर परिसरात तीव्र डोंगरउतार असून, या भागात झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते. अतिक्रमण वाढल्याने डोंगरावरील पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. त्यामुळे या परिसरात सातत्याने दरड कोसळण्याच्या देखील घटना घडतात. तसेच वागळे इस्टेट भागात देखील अश्याच झोपड्यांनी डोंगर परिसर व्यापून टाकला आहे. झोपडपट्टीधारकांनी केलेले अतिक्रम महापालिका प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. या भागात डोंगरावर अतिक्रमण होत असल्याने माळीनसारख्या दुर्घटनेची शक्यता देखील नाकारता येत नाही. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या परिसरातील नागरिकांना माहापलिकेच्या वतीने नोटीसा देण्यात येतात.

हेही वाचा -नाशिक -बिबट्याकडून घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार; थरार सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.