ठाणे : गोवरच्या आजाराने ( Measles Patients ) डोकेवर काढले असून बालकांना लसीकरण करून घेण्यास काही भागात विरोध केला जात आहे. दरम्यान, ठाणे महानगर पालिकेच्या ( Thane Municipal Corporation ) आरोग्य केंद्राच्या कौसा येथील हद्दीत एका घरात बालकांना लपवून ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरातील पालकांनी घरातच तब्बल ४ बालकांना ठेवून बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. ही बाब पालिकेच्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना लक्षात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोवर बाधित मुलांवर त्वरित उपचार केले. दरम्यान गोवर आजार संदर्भात लोकांची मानसिकता अजून बदललेली नसल्याचे या निमित्ताने उघड झाले असून पालिका प्रशासनाने शोधमोहीम आणखीन कठोर सुरु करून लसीकरण वाढवण्यासाठी पाऊले उचलले आहेत.
पालिकेचे बालकांवर त्वरित उपचार - बाळाला ताप आला तर तो कसला ताप आहे याची वाट न पाहता त्याला लगेच पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात घेऊन यावे. त्याच्यावर उपचार सुरू होतील आणि गोवर असेल तर वेळीच आजार आटोक्यात येईल. उशीर झाला तर ते पाल्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामूळे त्वरित त्याला डॉक्टरांना दाखवण्याचे आवाहान ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याआधी नागरिकांना केले आहे. मात्र, कुलूप बंद घरात गोवर बाधित बालकांना बंद करून ठेवल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य पथकाने कौसा येथील घरात धाड टाकून आजूबाजूला विचारणा केल्यानंतर घरात काही मुले असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान ४ लहान मुलाची सुटका करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही सर्व बालके ५ वयोगटाच्या आतील असल्याचे एका अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.
गोवरच्या लसिकरणाची मोहिम हाती - राज्यासह ठाणे जिल्यात गोवरच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.जिल्यात मोठ्या प्रमाणावर गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये मुंब्रा,कौसा आणि भिवंडी भागात सध्या जास्त रुग्ण गोवरचे असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पस्ट करण्यात आले आहे. ठाणे पालिका हद्दीत मुंब्रा, शिळ आणि कौसा या नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या भागात गोवर या आजाराचे बाधित अधिक सापडले आहेत. ठाणे पालिका हद्दीत आतापर्यंत ५१ रुग्ण उपचार घेत असून पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे ३६ तर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १४ रुग उपचार घेत आहेत. तर एक रुग्ण अति दक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागातील जेष्ठ अधिकाऱ्याने दिली. ठाणे महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील गोवरच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून काही भागात लसीला विरोध केला जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनापुढे मोठी समस्या असून सामजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांची मदत घेण्यात येत आहे.
महापालिका हद्दीतील रूग्ण - ठाणे महापालिकेच्या कौसा, एम एम व्हॅली, मुंब्रा, आतकोनेश्वर नगर आणि वर्तक येथील लक्ष्मी चिराग नगर येथे आरोग्य केंद्र गोवरचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. शहारत ० ते १ या वयोगटामध्ये १३ बालके बाधित आहेत, तर १ ते २ मध्ये ८, २ ते ५ वयोगटामध्ये १० आणि ५ ते १४ वयोगटामधील १२ बालके गोवर बाधित असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी काही जणांवर उपचार सुरु असून काहींना घरी सोडण्यात आले आहे.
३४१ गोवर बाधित रुग्ण - गोवरचे रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी पालिकेने शोधण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरु केले आहेत. यामध्ये आतापर्यंत ३४१ रुग्ण गोवर बाधित आढळले असून त्यांच्यावर पालिकेची करडी नाराज आहे. या रुग्णांना वेळेत उपचार केले जात असून लसीकरणावर भर दिला जात आहे. सर्वेक्षणाची सुरुवात १९ नोव्हेंबरला करण्यात आली असून पहिली फेरी २४ नोव्हेंबरला पूर्ण झाली आहे. आरोग्य विभाकडून दुसऱ्या फेरीला देखील सुरुवात झालेली असून ३० नोव्हेंबरला ती पूर्ण करण्यात येणार आहे. गोवरच्या प्रभावाचा काळ सात दिवसांचा असल्याने १० दिवसात प्रत्येक घर दोन वेळा भेट देण्यात येणार आहे. ज्यांना गोवरची लक्षणे आहेत अशी सगळी मुले शोधण्यात येणार आहे. प्रामुख्याने हे सर्वेक्षण कौसा, एम एम व्हॅली, मुंब्रा आणि कळवा येथे सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाजी महाराज रुग्णालयात १९ बेड ची व्यवस्था करण्यात आली असून पार्किंग प्लाझा येथे सुविधा करण्यात आली आहे. पुरेसे डॉक्टर देखील उपलब्ध आहेत. औषधांचा साठा देखील आहे. ठाणेकर नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.