ETV Bharat / state

कामाच्या पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ. विपीन शर्मांनी केली शहराची पाहणी - आयुक्त डॉ. विपीन शर्मा ठाणे पाहणी

काल आयुक्त विजय सिंघल यांची बदली झाली. डॉ. विपीन शर्मा यांनी आज महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. पहिल्याच दिवसांपासून डॉ. शर्मा यांनी शहराची पाहणी मोहिम हाती घेतली. त्यांनी कोरोना फिल्डमध्ये जाऊन कोवीड-१९ बाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली.

आयुक्त डॉ. विपीन शर्मा
Commissioner Dr. Vipin Sharma
author img

By

Published : Jun 25, 2020, 7:38 PM IST

ठाणे - डॉ. विपीन शर्मा यांनी आज महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. पहिल्याच दिवसांपासून डॉ. शर्मा यांनी शहराची पाहणी मोहिम हाती घेतली. त्यांनी कोरोना फिल्डमध्ये जाऊन कोवीड-१९ बाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच संपूर्ण लोकमान्यनगर, सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

कामाच्या पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ. विपीन शर्मांनी केली शहराची पाहणी

आयुक्त डॉ. शर्मा यांनी लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात कोरोनाचे किती रूग्ण आहेत. त्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जात आहेत याची माहिती घेतली. प्रभागांमध्ये सुरू असलेल्या फिव्हर क्लिनिकला आयुक्तांनी भेट दिली. तेथील डॉक्टरांशी संवाद साधून नेमके कशाप्रकारे काम चालते याची माहिती घेतली. कंटेन्मेंट झोनला भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यावेळी त्यांच्या समवेत उप आयुक्त संदीप माळवी, सहायक आयुक्त नयना ससाणे, डॉ. चारूशीला पंडीत आदी अधिकारी उपस्थित होते.

वॉर रूमला भेट -

महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज कोरोना वॉर रूमला भेट देवून तेथील कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कोविड-१९ विशेष अधिकारी रंजीत कुमार, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, कोरोना कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. केंद्रे, डॉ. राणी शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

बदलीमुळे दहशत; अधिकारी लागले कामाला -

कालच माजी आयुक्त विजय सिंघल यांची बदली झाली. ठाण्यातील कोरोना परिस्थिति त्यांना हाताळता आली नाही, असा आरोप सिंघल यांच्यावर होत आहे. त्यामुळे नवनियुक्त आयुक्तांनी पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.