ETV Bharat / state

Thane Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रशासन सतर्क; अनेक आस्थापना सील

मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने ( Thane Corporation On Corona Rise ) वाढ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या 24 तासात ठाणे महापालिका हद्दीत दोन हजारहून अधिक रुग्ण सापडल्याने प्रशासनाने कडक पावले ( Thane Corporation Strict Measures ) उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासन आणि ठाणे नगर पोलिसांकडून आज (शुक्रवारी) ठाण्यातील मध्यवर्ती असलेल्या घाऊक बाजारात विनामास्क ( Thane People Without Mask ) फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

Thane Corona Update
ठाणे कोरोना परिस्थिती
author img

By

Published : Jan 7, 2022, 5:56 PM IST

Updated : Jan 8, 2022, 1:31 PM IST

ठाणे - शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे आता पालिका प्रशासन संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावरून उतरून बिनामास्क आणि सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करत आहे. ( Thane Administration Taking Action ) कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर पूर्ण बाधितांची संख्या कमी होऊ लागली होती. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मुंबई ठाण्यातसह संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. ( Omicron Situation in Thane )

ठाणे कोरोना परिस्थिती

मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या 24 तासात ठाणे महापालिका हद्दीत दोन हजारहून अधिक रुग्ण सापडल्याने प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासन आणि ठाणे नगर पोलिसांकडून आज (शुक्रवारी) ठाण्यातील मध्यवर्ती असलेल्या घाऊक बाजारात विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे.

हेही वाचा - Omicron Positive Family gone Tour : केनियाहून आलेले ओमायक्रॉन पॉझिटिव्ह कुटूंब सहलीला; गुन्हा दाखल

दुकानदारांवरही कारवाई करण्यात येत आहे. ज्या दुकानांत गर्दी होत आहे, त्याच्यावर देखील पालिका आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी ठाण्यातील मुख्य बाजार पेठ, जांभळी नाका परिसरात ठाणे पालिकेचे एक पथक आणि ठाणे नगर पोलिसांचे एक पथक अशी 2 पथके रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. ही कारवाई नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी नसून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे, असे यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत.

दुकाने आस्थापना होत आहेत सील -

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात दंड वसुली करण्यात आली आहे. गरज पडली तर दुकानेही सील करण्यात येतील, असा इशारा पालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे. या पुढेही सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या आणि मास्क न लावणाऱ्या कार्यालयावर पालिका सील करण्याची कारवाई करणार आहे.

Last Updated : Jan 8, 2022, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.