ठाणे - उच्च न्यायालयाची बंदी असताना देखील गेल्या दोन दिवसांपासून मेट्रो प्रकल्पासह इतर कामांसाठी कोपरी येथे अंधारात झाडांची कत्तल करण्यात येत आहे. यासंदर्भात शुक्रवारी काही सामाजिक संघटनांनी ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. या वृक्षतोडीकडे ठाणे महापालिका प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
हेही वाचा - आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा
या वृक्षतोडीसंदर्भात सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, असे आदेश आता महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाण्यातील वृक्षप्रेमींमध्ये महापालिकेच्या भूमिकेबाबत निर्माण झालेला गैरसमज तातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे म्हस्के यावेळी म्हणाले. रात्रीच्या अंधारात ही वृक्षतोड सुरू असताना मनसे नेते अविनाश जाधव घटनास्थळी पोहचले होते आणि त्यांनीही याबाबत आक्षेप नोंदवला होता.
हेही वाचा - आरेवरुन आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने, स्थगितीचा निर्णय दुर्दैवी - फडणवीस