ठाणे - 'स्मार्ट ठाणे-स्मार्ट न्यूजपेपर स्टॉल' या संकल्पाने अंतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिकृत स्टॉल मिळणार आहेत. ठाणे महानगरपालिका ही भारतामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देणारी पहिली महानगरपालिका ठरली.
ठाण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी २००२ सली वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल अधिकृत होण्यासाठी पत्रकार कैलास म्हापदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव २००६ साली महापौर राजन विचारे असताना पास झाला होता, पण काही कारणास्तव तो प्रत्यक्षात लागू झाला नव्हता. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलच्या बाबतीत आमदार संजय केळकर यांनी राज्याचे नगरविकास खात्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता. ठाणे महापालिका प्रशासनाने आमच्या वृत्तपत्र विक्रेत्यांची दखल घेऊन तो ठराव ठाण्यातील १५९ वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉलच्या बाबतीत लागू केला. त्याबद्दल सर्व विक्रेत्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त संजय जयस्वाल यांचे आभार मानले.
आयुक्तांचे स्मार्ट ठाण्याचे स्वप्न आहे, त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेताही सहभागी होणार असून ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन तर्फे "स्मार्ट ठाणे-स्मार्ट न्यूजपेपर स्टॉल" ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच आम्ही आयुक्त संजय जयस्वाल यांना लवकरच भेटणार आहोत, असे ठाणेशहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या असंघटित कामगारांसाठीच्या वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी योजना अंमलबजावणी करीता झालेल्या समितीने सांगितले.