ठाणे - जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींच्या 994 जागांसाठी आज निकालाचा दिवस असून काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील 5 तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या तालुक्यातील मतमोजणी होणार असून यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचे वर्चस्व तर काही अंशी भाजपाने ग्रामीण भागात मुसंडी मारल्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपा शिवसेनेमध्येच खरी लढत जिल्ह्यात पाहावयास मिळणार आहे.
ग्रामीण भागात शिवसेनेची सरशी...
जिल्हातील ग्रामीण भागातील 5 तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहता, भाजपा आणि शिवसेनेचा 1 खासदार, तर मुरबाडमध्ये भाजपाचा आमदार, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेनाचे आमदार तर शहापूरमध्ये राष्टवादीचा आमदार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदही शिवसनेच्या कब्जात असल्याने 5 तालुक्यातील 3 पंचायत समित्या सेनेच्या तर 1 भाजपा ताब्यात असून भिवंडीत मात्र भाजपा - शिवसेनेत समान संख्या बळ असल्याने ‘आधा तुमारा आधा हमारा’ असा राजकीय हिशेब ठेवून पंचायती समितीचा कारभार सुरु आहे. एकंदरीतच जिल्ह्यात भाजपापेक्षा शिवसेना ग्रामपंचायतीच्या निकालात सरस राहणार, असे चित्र आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांची काही वेळातच सुरुवात; सेना-भाजपामध्येच टक्कर - ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल न्यूज
जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींच्या 994 जागांसाठी आज निकालाचा दिवस असून काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील 5 तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या तालुक्यातील मतमोजणी होणार असून यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.