ETV Bharat / state

Thane Crime News: पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल - Unnatural Abuse

Thane Crime News : पतीने बळजबरीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे. शिवाय पीडित पत्नीचा सासरच्या नातेवाईकांनी शारीरिक व मानिसक छळ करत होते. अखेर पतीसह सासरच्या छळाला कंटाळून पीडितेने पती विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police Stations) विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

Thane Crime News
पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 10:14 PM IST

ठाणे Thane Crime News: ३१ वर्षीय पीडित पत्नीवर तिच्या पतीने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) केल्याची घटना घडली आहे. तसेच सासरच्या नातेवाईकांनी शाररीक व मानसिक छळ केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police Stations) विविध कलामा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीमध्ये पतीच्या प्रेयसीचा समावेश आहे.

मानसिक व शारीरिक छळ : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता ही उल्हासनगर कॅम्प नंबर एक भागात कुटूंबासह राहते. तिचा विवाह २०२२ पूर्वी चंद्रपूर शहरात राहणाऱ्या आरोपी पतीशी झाला. त्यातच पीडित पत्नी ही चंद्रपूर येथे असलेल्या सासरी राहात असतानाचा, ३० जून २०२२ ते २९ जुलै २०२३ पर्यत गुन्हा दाखल असलेल्या १२ जणांनी आपसात संगनमत करून पीडितेला शिवीगाळ व मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. तर आरोपी पती हा पीडित पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करीत होता. खळबळजनक बाब म्हणजे पिडितेचा जेठ याने याच दरम्यान घरातील किचनमध्ये तिचा विनयभंग केला होता. या सर्व आरोपींच्या जाचाला कंटाळून पीडित पत्नीनी माहेरी आली होती.

३१ वर्षीय पीडित पत्नीवर तिच्या पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह चंद्रपुरात राहणाऱ्या १२ नातेवाइकांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १२ आरोपी यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना लवकरच ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. - दिलीप फुलपगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : माहेरी आल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या १२ नातेवाइकांवर कारवाईसाठी तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पतीवर भादंवि कलम ३७७, तसेच जेठ विरोधात ३५४ (विनयभंग) चा गुन्हा तर पतीच्या प्रेयसीसह सासू , सासरे, जेठानी, दोन चुलत दीर, त्याचे सासरे आणि जेठानीची आई-वडील अश्या डझनभर नातेवाइकांवर (शनिवार ) २१ ऑक्टोंबर रोजी भादंवि कलम ४९८(अ), ४२०, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण आर घुडूगडे करत आहेत.

हेही वाचा -

  1. Sexual Assault With Animal : लैंगिक भूक भागवण्यासाठी रेडकावर करायचा अनैसर्गिक अत्याचार; वाचा कसं फुटलं बिंग
  2. Thane Crime News : तृतीयपंथीवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना अटक
  3. पोलिसाचे घृणास्पद कृत्य.. गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणावर व्हिडिओ शूट करत अनैसर्गिक अत्याचार..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.