ETV Bharat / state

खळबळजनक! तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल - बेदम मारहाण व्हिडिओ

Thane Crime News : पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं चित्र ठाण्यातील एका खळबळजनक घटनेनं दिसून येतंय. ठाण्यात एका तरुणाला नग्न करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. फक्त ३०० रुपयांसाठी त्याच्यावर हा अत्याचार करण्यात आला. या तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही (video viral) केला आहे.

A Young Man was Naked And Beaten
तरुणाला नग्न करून बेदम मारहाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 5:41 PM IST

तरुणाला नग्न करून केली बेदम मारहाण

ठाणे Thane Crime News : उसने घेतलेले केवळ ३०० रुपये परत करण्यास नकार दिल्यानं, एका १७ वर्षीय युवकाला नग्न करून रस्त्यात पळवून बेदम मारहाण केल्याची अमानुष घटना घडली आहे. कळव्यातील दोन युवकांनी या युवकाला नग्नावस्थेत गल्लीबोळात पळवून मारहाण केली. कळवा पोलिसांनी या संदर्भात आधी केवळ तक्रार घेतली होती. परंतु सदरचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर कळवा पोलिसांनी (Kalwa Police Station) आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्लुटूथ चोरल्याचा आरोप : कळव्यात राहणाऱ्या 17 वर्षीय युवकाचा कळव्यातील जामा मशीद परिसरात राहणाऱ्या तौसिफ़ खानबंदे आणि सामील खानबंदे यांच्याशी वाद झाला होता. तौसिफ याने पीडित युवकावर आपल्या घरातून ब्लुटूथ चोरल्याचा आरोप केला. तसंच उसने घेतलेले ३०० रुपये परत मागितले. पीडित युवकाने पैसे देण्यास नकार दिल्यानं, संतापलेल्या तौसिफ आणि सामील यांनी पीडित युवकाला बाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली.

विवस्त्र अवस्थेत केला व्हिडिओ : पीडित युवकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोघा आरोपींनी त्याचे कपडे काढून घेतले. त्याला विवस्त्र करत मारहाण केली. गल्लीबोळातून पीडित युवकाला विवस्त्र अवस्थेत पळवून मारल्याचा व्हिडिओ (video viral) देखील वायरल केला. स्थानिक पोलिसांनी या विरोधात केवळ तक्रार नोंदवून घेतली होती. परंतु सदरचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात भादंवी ३२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गावात घटना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यातील कळवा उपनगरातील जामा मशिदीजवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली. तौसिफ खानबांडे आणि सामिल खानबांडे हे दोघे जवळच्या अन्नपूर्णा बिल्डिंगमध्ये अल्पवयीन मुलाच्या घरात घुसले. ब्लूटूथ डिव्हाइसच्या चोरीचा आरोप त्याच्यावर करून दोघांनी भांडण करण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून घेतलेल्या 300 रुपयांची मागणीही केली. त्यावेळेस मुलाने आरोप नाकारून 300 रू देण्यास नकार दिला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : खानबांडे या दोघांनी त्या मुलाला मारहाण केली. त्यावेळेस मदतीसाठी ओरडताच मुलाच्या पाठीवर चाबकाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी त्या मुलाला पकडून सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे विवस्त्र केलं. तो अल्पवयीन कसा तरी एका अरुंद गल्लीतून घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर, त्यानं तक्रार देण्यासाठी कळवा पोलीस स्टेशन गाठलं. परंतु पोलिसांनी या प्रकरणात फक्त नॉन-कॉग्निजेबल गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री उशिरा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी या घटनेचं लक्ष वेधून घेत तीव्र संताप व्यक्त केला.

मुख्य आरोपी तौसिफला अटक : सामाजिक कार्यकर्ते यांनी हा व्हिडिओ ठाणे पोलिसांच्या उच्च आधिकारी यांना पाठवला. शेवटी पोलिस उपायुक्त (झोन-1) गणेश एन. गावडे यांनी या प्रकरणी तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. आज पहाटे, कळवा पोलिसांनी कारवाई केली. तसेच मुलाच्या तक्रारीच्या आधारे POCSO आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांचा वापर करून एफआयआर दाखल करण्यात आला. यातील मुख्य आरोपी तौसिफला आज दुपारी अटक करण्यात आली, तर पोलीस फरार सामीलच्या शोधात आहेत.

हेही वाचा -

  1. West Bengal Violence: मणिपूर पाठोपाठ... पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, दोन महिलांना बेदम मारहाण करून नग्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर
  2. पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण, नग्न करून कोयत्याने मारहाण
  3. Man beaten woman, महिलेला नग्न करुन बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.