ठाणे - ठाण्यात एक विचित्र घटना घडली ( Thane Crime News ) आहे. एका भटक्या श्वानावर ४५ वर्षीय व्यक्तीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली ( Sexually Abusing The Female Dog ) आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात विकृतावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. रिजवान अब्दुल शेख (वय ४५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
उल्हासनगर - अंबरनाथ मार्गावरील साईबाबा मंदिराशेजारी एक वस्ती आहे. या वस्तीत रिजवान राहतो. तर त्याच्या शेजारीच २१ वर्षीय तरुणी राहत असून, या दोघांमध्ये १ मार्च रोजी काही कारणावरून सायंकाळच्या सुमारास वाद झाला होता. त्या वादातून रिजवानने तरुणीला शिविगाळ केली. त्यानंतर तिच्या समोरच तो एका भटक्या श्वानाला त्याच्या घरात घेऊन गेला. त्याने त्या श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केले. ही माहिती तरुणीला मिळताच तिने 2 मार्च रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन भादवी कलम 377, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काल (बुधवारी ) दुपारच्या सुमारास रिजवानला ताब्यात घेत अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.