ETV Bharat / state

Thane Crime Extortion Case: युट्युब न्यूज चॅनलच्या तीन कथित पत्रकारांनी 'हा' केला कारनामा, खंडणीचा गुन्हा दाखल - तीन कथित पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा

Thane crime extortion case युट्यूब चॅनेलनच्या माध्यमातून खंडणी मागणाऱ्या भिवंडीतील तिघांविरोधात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने युट्यूब न्यूज चॅनल चालविणाऱ्या पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Thane Crime Extortion Case
Thane Crime Extortion Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 10:26 PM IST

ठाणे Thane crime extortion case : एका युट्यूब चॅनेलच्या कथित तीन पत्रकारांनी खासगी रुग्णालयाच्या बदनामीचा मजकूर लिहून व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी युट्यूब न्यूज चॅनलच्या तीन पत्रकारांवर डॉक्टरांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात खंडणीसह विविध कलमान्वये आज गुन्हा दाखल केला आहे. इमरान, सोहेल आणि नियाज शेख असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल असलेल्या तीन पत्रकारांनी भिवंडी शहरातील भादवड परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयाच्या बदनामी करण्याची धमकी देत रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. परंतु रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने खंडणीची रक्कम न दिल्यानं त्या खासगी रुग्णालयाचा व्हिडिओ लाईफ इन भिवंडी (LIB) या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केल्याचे डॉक्टरने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच नाही तर वादग्रस्त व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांवरही प्रसारित करण्यात आलाय.

व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी- भिवंडी शहरात सुमारे दोन डझनहून अधिक युट्यूबर आहेत. या युट्यूबरकडून बनावट न्यूज चॅनल सुरू करून बातम्यांसारखे व्हिडिओ व्हायरल करण्याचा धंदा सुरू केला आहे. अनेक जण स्वतःच्या ओळखपत्रावर स्वाक्षरी करतात. स्वतःसह डझनभर लोकांना पत्रकार म्हणून तोरा मिरवण्याचे ओळखपत्र देत असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. हेच लोक पत्रकार असल्याचे नाव घेऊन अवैध कामात गुंतलेल्या लोकांचे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.

युट्यूब चॅनलवरून व्हिडिओ डिलीट- रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरच्या तक्रारीच्या अनुषंगाने शांतीनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंवि कलम ३८५,५०१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयाचा व्हिडिओ इतर चार ते पाच यूट्यूब स्वयंघोषित पत्रकारांनी आपापल्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केला होता. मात्र पोलिसांची कारवाई पाहून त्यांनी संबंधित युट्यूब चॅनलवरून व्हिडिओ डिलीट केला आहे. युट्यूबवर बनावट चॅनेलची टोळी तयार करून नागरिक आणि व्यावसायिकांकडून खंडणी मागूण्याचा धंदा सुरू करण्यात आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. अशी प्रकरणे पोलीस प्रशासनाने तपासणे आवश्यक असल्याची मागणी विविध पत्रकार संघटनांनी यापूर्वीच केली आहे. Thane Crime

हेही वाचा-

  1. Extortion Money from Judge : चक्क न्यायाधीशांकडे मागितली 15 लाखांची खंडणी, जीएसटी निरीक्षकासह कथित पत्रकाराविरोधात गु्न्हा दाखल
  2. Hemant Parakh Kidnapping: अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक हेमंत पारख यांची सुरतजवळ सुटका. नेमकं काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.