ETV Bharat / state

पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी कोम्बिंग ऑपरेशनच्या भीतीने इराणी वस्ती झाली 'वीराण' - कल्याण कसारा रेल्वे मार्ग

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशन नजीकच्या कबिल्यातील हिंसक इराणी आणि पोलिसांमध्ये वारंवार चकमकी झडल्या आहेत. या कबिल्यात लपलेल्या गुन्हेगारांना उचलून आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मार खाऊन हात हलवत परतावे लागण्याची आतापर्यंतची ही आठवी घटना आहे. त्यामुळे अशा हिंसक इराण्यांचा कणा मोडणे हे पोलिसांपुढे कडवे आव्हान उभे राहिले आहे.

कोम्बिंग ऑपरेशनच्या भीतीने इराणी वस्ती झाली 'वीराण'

author img

By

Published : Feb 6, 2021, 2:23 AM IST

Updated : Feb 6, 2021, 2:28 AM IST

ठाणे - सराईत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आंबिवलीच्या इराणी वस्तीत हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी १८ जणांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या आरोपींच्या मागावर आहेत. तर दुसरीकडे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या इराणी वस्तीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या भीतीने या वस्तीतील अनेक इराण्यांनी धूम ठोकली आहे. यामुळे इराणी वस्ती आत 'वीराण' झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भीतीने इराणी वस्ती झाली 'वीराण'
भीतीने इराणी वस्ती झाली 'वीराण'
हल्लेखोर इराणींना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके ...

सराईत गुन्हेगाराला पकडून परतणाऱ्या नालसोपारा क्राईम ब्रांचच्या पोलिसांवर कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीतील नागरिकांनी गुरुवारी दगडफेक करून हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले, तर पोलिसांची गाडी देखील फोडली आहे. या घटनेनंतर आज या परिसरात स्थानिक पोलिसाकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या १८ जणांविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कायदा हातात घेणाऱ्या या इराणी वस्तीतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केल्याची माहिती पोलिसाकडून देण्यात आली आहे.

कबिल्यातील हिंसक इराणी आणि पोलिसांमध्ये वारंवार चकमकी ...

पादचारी महिलांच्या गळ्यातील दागिने-सौभाग्यालंकार धूम स्टाईलने लांबविण्यात इराण्यांचा हातखंडा आहे. एकेकाच्या शीरावर जवळपास 15 - 20 गुन्हे दाखल असल्याने अशा गुन्हेगारांची मोस्ट वॉन्टेड यादीत नावे समाविष्ट करण्यात आली आहे. या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशन नजीकच्या कबिल्यातील हिंसक इराणी आणि पोलिसांमध्ये वारंवार चकमकी झडल्या आहेत. या कबिल्यात लपलेल्या गुन्हेगारांना उचलून आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मार खाऊन हात हलवत परतावे लागण्याची आतापर्यंतची ही आठवी घटना आहे. त्यामुळे अशा हिंसक इराण्यांचा कणा मोडणे हे पोलिसांपुढे कडवे आव्हान उभे राहिले आहे.

कोम्बिंग ऑपरेशनच्या भीतीने इराणी वस्ती झाली 'वीराण'
इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ल्याच्या भयंकर घटना मागोवा ...

1) 20 ऑगस्ट 2008 ची भयंकर घटना :

फूटपाथवर गॉगल (चष्मे) विक्री करणारी या जमातीचा मुख्य धंदा गुन्हे करणे मानला जातो. यातील महिला फूटपाथवर गॉगल (चष्मे) विक्री करताना आढळून येतात. मात्र पुरुष मंडळी शहरात फिरून गुन्हे करण्यात तरबेज असतात. प्रामुख्याने बँकेत जाऊन नोटा मोजून देण्याच्या नावाखाली हातचलाखी करत पैसे लांबविणे, तोतया पोलिसगिरी करणे आणि धूम स्टाईलने पादचारी महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविणे , अशा गुन्ह्यांत इराणी जमातीचा वरचष्मा आहे. मात्र या गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या आरोपींना उचलायला गेल्यावर महिला प्रामुख्याने आक्रमक होतात. याची प्रचिती क्राईम ब्रँचच्या कल्याण यूनिटला यापूर्वी आली आहे. या यूनिटचे फौजदार विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पथकावर संतप्त इराण्यांनी हिंसक हल्ला चढविला. यात प्रकाश मोरे, सुरेश गोरे, सुरेश कबीर हे तीन पोलीस जबर जखमी झाले. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात कलंदर अली हुसेन इराणी या खूँखार गुन्हेगार तथा कबिल्याच्या सरदारासह त्याचा साथीदार मुलगा कंबर हे दोघे जागीच ठार झाले होते. या धूमश्चक्रीत शार्पशूटर हवालदार प्रकाश मोरे यांनी दोघा बाप-लेकांना अचूक टिपले. नाहीतर हिंसक इराणी पोलिसांना गाडीसह घासलेट ओतून पेटवून देण्याच्या तयारीत होते. म्हणून प्रकाश होता म्हणून वाचले पोलीस, असा पोलीस खात्यात सूर आळवला जात होता.

2) 20 सप्टेंबर 2014 ची घटना :

ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालून पादचारी महिलांसह पोलिसांनाही हैराण करून सोडणारा कुख्यात लुटारू अमजद हाफिज उर्फ अमजद सईद इराणी याला पकडण्यासाठी पोलीस जंग-जंग पछाडत होते. या लुटारूचे वास्तव्य प्रामुख्याने इराणी कबिल्यात असल्याची खबर कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम हे आपल्या पुरुष आणि महिला कर्मचारी पथकासह संध्याकाळी या कबिल्यात कोम्बिंग ऑपरेशनसाठी घुसले. पोलीस आल्याची खबर पसरताच अख्खा कबिला घरा बाहेर पडला. यातील या जमावात महिलांचा मोठा समावेश होता. संतप्त इराण्यांनी पोलिसांवर अचानक हिंसक हल्ला चढविला. या हल्ल्यात काही पोलिसांना मार खावा लागला. पोलीस आणि हिंसक इराणी यांच्यातील झटापटीच्या संधीचा फायदा घेऊन मोस्ट वाँटेड अमजद इराणी हा मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. त्याला अटक करण्या ऐवजी रिकाम्या हाताने पोलिसांना माघारी परतावे लागले होते.

3) 2 जानेवारी 2015 ची घटना :

याच कबिल्यात सादिक उर्फ साधू इराणी आणि जग्गू इराणी हे चैन स्नॅचिंगच्या गुह्यांतील पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी लपले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत थोरात यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार दिनेश काटके, भीमराव बागूल, सोमनाथ ठिकेकर यांच्यासह सहा जणांच्या पथकाने तेथील बेडा पाटील चाळीतल्या खोली क्रमांक 2 मधून सादिक उर्फ साधू आणि जग्गू या दोघांना उचलले. पोलीस आल्याची खबर वाऱ्या सारखी पसरताच कबिल्यातील शहनाज, खानम, नजमा या तिघींसह 5-6 इराण्यांनी पोलिसांना गराडा घातला. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पळवून लावण्यासाठी खानम हिने बागूल यांना; तर नजमा हिने काटके यांना कडाडून चावे घेतले. परिणामी पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्याऐवजी हात हलवत परतावे लागले. विशेष म्हणजे या पथकात एकही अधिकाऱ्याची नियुक्ती नसून असलेल्या एकाही कर्मचाऱ्याकडे स्व-संरक्षणाकरिता अग्निशस्त्र नव्हते, हे देखील या घटनेतून समोर आले होते.

4) 14 जानेवारी 2015 ची घटना :

या वस्तीत सादकअली युसूफअली ईराणी हा विविध गुह्यांत पोलिसांना हवा असलेला नामचीन गुन्हेगार लपला असल्याची खबर झोन-3 आणि 4 च्या स्पेशल स्क्वॉडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना मिळाली होती. त्यानुसार या स्क्वॉडच्या 8-10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी वस्तीत घुसून कारवाई केली. मात्र पोलीस आल्याची खबर वस्तीत वाऱ्या सारखी पसरताच पुरूष आणि महिला मोठ्या संख्येने तेथे जमल्या. यातील महिलांनी शिविगाळ करत पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगत जोरदार धक्काबुक्की तर केलीच, शिवाय कुख्यात गुन्हेगार सादकअली याला तेथून पोलिसांच्या हाती लागण्याआधीच पळून जाण्यास मदत केली. त्यामुळे पोलिसांना सादकअली याला जेरबंद करण्याऐवजी हात हलवत परतावे लागले. विशेष म्हणजे ही कारवाई करताना मागील अनुभवांचा अंदाज घेऊन ज्यादा कुमक घेण्या ऐवजी तुटपूंजे बळ घेतल्याने स्पेशल स्क्वॉडचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

5) 13 जून 2015 ची घटना :

जेनब इराणी ही गुन्हेगारांनी लुटलेले सोने व्यापारी-सोनारांना वटवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ-५च्या विशेष पथकाने जेनबला ताब्यात घेण्यासाठी मोहने पोलीस चौकीच्या नाक्यावर जाळे पसरले. जेनब रिक्षातून उतरताच पोलिसांनी गराडा घालून ताब्यात घेतले. मात्र जेनबला सोडविण्यासाठी तेथील जवळपास चाळीस जणांच्या हिंसक इराण्यांनी काठ्या-लाठ्या तसेच दगडांचा हल्ला चढविला. तुटपुंज्या पोलिसांची ताकद या हल्ल्यापुढे कमी पडली. त्यामुळे कुख्यात आरोपी जेनब इराणी हिला ताब्यात घेण्याऐवजी रिकाम्या हाताने या पोलीस पथकाला परतावे लागले. या हल्यात काही पोलीस जखमी झाले होते. तेव्हा तब्बल 40 सशस्त्र इराण्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागला होता.

6) 19 जुलै 2015 ची घटना :

इराणी कबिल्यात शब्बीर सय्यद, आस्मी सय्यद, आशू सय्यद आणि तौफीक सैय्यद हे पोलीस रेकॉर्डवरील चार लुटारू लपले असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उल्हासनगर परिमंडळ - 4 च्या स्पेशल स्कवॉड आणि अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वस्तीत घुसले. या पथकाने पाठलाग करून आशू इराणी याला शिताफीने पकडले. हे पाहताच तलवारी, लोखंडी सळ्या, रॉड, आदि घातक शस्त्रे घेऊन संपूर्ण इराणी कबिला घराबाहेर पडला. दगडफेक करत या हिंसक जमावाने "मार डालो...काट डालो..." असा हल्लाबोल करत पोलिसांवर सशस्त्र हल्ला चढविला. या हल्ल्यात सपोनि गणेश कुंभार यांच्यासह महाजन, चव्हाण, वाकचौरे आणि महाले हे कर्मचारी जखमी झाले. या झटापटी दरम्यान ताब्यात घेतलेला कुख्यात लुटारू आशू इराणी हा अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातून निसटला. अचानक झालेल्या इराण्यांच्या सशस्त्र हल्ल्यापुढे डाळ न शिजल्याने पोलिसांना तेथून पळ काढावा लागला.

7) 8 एप्रिल 2017 :

शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस रेकॉर्डवरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार समीर इराणी आणि हसन इराणी सय्यद या दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक आंबिवलीत दाखल झाले. या पथकाने आपली कारवाई सुरू करताच तेथे जमलेल्या 20 ते 25 महिलांच्या जमावाने पोलीस निरीक्षक सावंत आणि पोलीस नाईक महाजन यांच्या अंगावर पेट्रोल मिश्रीत घासलेट ओतले. प्रसंगावधान राखून या दोघांनी तेथून पळ काढला. अन्यथा पोलिसांवर फार मोठा अनर्थ ओढविला असता. या झटापटी दरम्यान त्यांच्यावर प्राणघातक हल्ला तर केलाच, शिवाय आरोपींना ताब्यात घेऊन परतत असताना देखील पोलीस गाडी अडवून या महिलांनी पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. परिणामी याच संधीचा फायदा घेऊन दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून तेथून पळ काढला. अखेर या पथकाला हात हलवत मार खाऊन परतावे लागले.

अशीच आठवी घटना शुक्रवारी 17 ऑगस्ट 2018 रोजी दुपारच्या सुमारास याच इराणी कबिल्यात ठिकाणी घडली. अब्बासी शाजोर इराणी (22) या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर हिंसक इराण्यांच्या जमावाने सशस्त्र हल्ला चढविला. एकीकडे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांची संख्या 8 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत पोलिसांनी 37 हल्लेखोरांपैकी हवा असलेला कुख्यात लुटारू अब्बासी याच्यासह त्याची आई सलमा शाजोर इराणी (40) या माय-लेकाला अटक केली. मात्र धरपकडीच्या भितीने रबाब इराणी, हसन इराणी, नसीम फायद, अली फायद, मेहंदी फायद, सोनिया उर्फ टिलू आनंद, अली हसन, रेखा अफसर, अफसर इराणी, सावली इराणी, मरिअम इराणी, बिट्टी पप्पू, सुगी फिरोज, निसार मिस्कीन आणि संजी उर्फ टिल्लू इराणी, यांच्यासह 40 हल्लेखोर कबिला सोडून परागंदा झाले असून अद्याप हाती लागले नाहीत.

Last Updated : Feb 6, 2021, 2:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.