ETV Bharat / state

शाळा 16 जानेवारीपर्यंत सुरू करू नये - ठाणे जिल्हाधिकारी - Thane collector Rajesh Narvekar news

इंग्लंडमधील कोरोनाच्या विषाणूच्या नवीन प्रादुर्भावामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच 16 जानेवारीपर्यंत तरी शाळा सुरू करता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ठाणे जिल्हाधिकारी
ठाणे जिल्हाधिकारी
author img

By

Published : Dec 30, 2020, 7:32 PM IST

Updated : Dec 30, 2020, 9:07 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील शाळा 16 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करू नयेत, असे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात घरातूनच अभ्यास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशात मार्चमध्ये संपूर्णत: टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शाळेचे शैक्षणिक सत्र यंदा सुरू होऊ शकले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्ववत झाले. मात्र, पुन्हा दिवाळीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही नियम लागू करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा टाळेबंदी लागू होण्याची साशंकता व्यक्त होत होती. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. दरम्यान, इंग्लंडमधील कोरोनाच्या विषाणूच्या नवीन प्रादुर्भावामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच 16 जानेवारीपर्यंत तरी शाळा सुरू करता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रभाव ओसरत असल्याने जिल्ह्यातील शाळांना सज्ज राहण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-मध्य प्रदेश : मालकाने श्वानाच्या नावे केली पन्नास टक्के संपत्ती

शाळाबाबतीत राज्य सरकार घेणार निर्णय

राज्य सरकारने शाळा बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हानिहाय निर्णय हे जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कोरोना संक्रमण कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरू होऊ शकतात. कोरोनाचे संक्रमण असलेल्या ठिकाणी शाळा सुरू होण्यासाठी विलंब लागणार आहे. त्यासाठी आवश्यक निर्णय राज्य सरकारकडून वेळीच निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा-शिर्डी बेपत्ता प्रकरण, 3 वर्षांनी महिला सापडली प्रियकरासोबत

Last Updated : Dec 30, 2020, 9:07 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.