ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाडांचा पूरग्रस्तांसाठी 'संघर्ष', मदतीचे दोन ट्रक कोल्हापूरसह सांगलीकडे रवाना - राष्ट्रवादी उपाध्यक्ष रचना वैद्य

कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी प्रत्येकाने जमेल तशी मदत करावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते.

जितेंद्र आव्हाड यांच्या आवाहनानंतर दोन ट्रक पुरग्रस्तांसाठी मदत रवाना
author img

By

Published : Aug 13, 2019, 9:47 AM IST

Updated : Aug 13, 2019, 10:53 AM IST

ठाणे - सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीमुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी ठाणेकरांनी हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'संघंर्ष या संस्थेच्या माध्यमातून केले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

सोमवारी 22 टनाचे 2 ट्रक जीवनाश्यक साहित्य घेऊन सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने आव्हाड यांनी रवाना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.

राष्ट्रवादी उपाध्यक्ष रचना वैद्य यांच्या नियोजनाखाली ठाणे शहरातील शिवाई नगर म्हाडा कॉलनी, लक्ष्मी नारायण रेसीडेन्सीर, निळकंठ हाईट्स, गावंड बाग, नीळकंठ ग्रीन्स, श्री सत्य शंकर रेसिडेन्सी, अ‍ॅक्मे ओझोन, ईडन वुड्स फेडरेशन, हिरानंदानी मेडोज, हाईड पार्क, निहारीका कनाकिया स्पेस, हायलँड पार्क, हिरानंदानी इस्टेट, लोढा, रुस्तमजी अर्बानिया, वृंदावन सोसायटी, रहेजा गार्डन, वसंत लॉन्स, विकास पाम्स, ओएसिस सफायर, रंग श्री सोसायटी, यशवर्धन सोसायटी, पंचशील सोसायटी, एक संघर्ष मित्र मंडळ, पांचपाखाडी, ठाणे तसेच इतर दानशूर नागरिकांनी आव्हाड यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अवघ्या तीनच दिवसात दानशूर ठाणेकरांनी ब्लँकेट, कपडे, बिस्कीटे, गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा पावडर, डाळी, मीठ-मसाला, मिनरल वॉटरच्या बाटल्या तसेच सॅनिटरी नॅपकीन्स, फिनेल, डेटॉल आदी जीवनावश्यक वस्तू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जमा केल्या. सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आमदार आव्हाड यांनी दोन ट्रकमध्ये भरून हे साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केले. हा प्रतिसाद बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांचे आभार मानले.

Intro:जितेंद्र आव्हाड यांच्या आवाहणानंतर दोन ट्रक पुरग्रस्तांसाठी मदत रवानाBody:सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीमुळे हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी ठाणेकरांनी हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'संघंर्ष या संस्थेच्या माध्यमातून केले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज 22 टनाचे 2 ट्रक जीवनाश्यक साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने आव्हाड यांनी रवाना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी प्रत्येकाने जमेल तशी मदत करावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते. राष्ट्रवादी उपाध्यक्ष रचना वैद्य यांच्या नियोजनाखाली ठाणे शहरातील पुढील सोसायटी मधील रहिवाशी शिवाई नगर म्हाडा कॉलनी, लक्ष्मी नारायण रेसीडेन्सीर, निळकंठ हाईट्स, गावंड बाग, नीळकंठ ग्रीन्स, श्री सत्य शंकर रेसिडेन्सी, अ‍ॅक्मे ओझोन, ईडन वुड्स फेडरेशन, हिरानंदानी मेडोज, हाईड पार्क, निहारीका कनाकिया स्पेस, हायलँड पार्क, हिरानंदानी इस्टेट, लोढा, रुस्तमजी अर्बानिया, वृंदावन सोसायटी, रहेजा गार्डन, वसंत लॉन्स, विकास पाम्स, ओएसिस सफायर, रंग श्री सोसायटी, यशवर्धन सोसायटी, पंचशील सोसायटी, एक संघर्ष मित्र मंडळ, पांचपाखाडी, ठाणे तसेच इतर दानशूर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या तीनच दिवसात दानशूर ठाणेकरांनी ब्लॅंकेट, कपडे, बिस्कीटे, गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा पावडर, डाळी, मीठ- मसाला, मिनरल वॉटरच्या बाटल्या तसेच सॅनिटरी नॅपकीन्स, फिनेल, डेटॉल आदी जीवनावश्यक वस्तू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जमा केल्या. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आ. आव्हाड यांनी दोन ट्रकमध्ये भरून हे साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केले.
ना ओळखीचे, ना पाळखीचे; ज्यांना सांगली- कोल्हापूर कुठे आहे, हे माहित नाही. अशा लोकानींनीही मदत केली. हा प्रतिसाद बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांचे आभार मानले.

BYTE डॉ. जितेंद्र आव्हाड ( राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार )
Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.