ETV Bharat / state

ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाचा गुतंवणुकदारांना गंडा; बनावट कागदपत्रे बनवून विकल्या सदनिका - economic crime

गुंतवणूकदारांना नोंदणी करून देण्यात आलेल्या सदनिका आणि व्यावसायिक गाळे बनावट कागदपत्रे बनवून अनेकांना विकल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : May 29, 2019, 7:51 PM IST

ठाणे - गुंतवणूकदारांना नोंदणी करून देण्यात आलेल्या सदनिका आणि व्यावसायिक गाळे बनावट कागदपत्रे बनवून अनेकांना विकल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी संजय भालेराव आणि प्रतिमा भालेराव यांच्या विरुद्ध राबोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे गुंतवणूकदारांनी तब्बल २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक केले होती.

पोलीस तपासासाठी कागदपत्रे ताब्यात घेताना

बाधंकाम व्यावसायिकाने गुंतवणुकदारांना चांगल्या परताव्याचे अमिष दाखविले होते. याप्रकरणी तक्रारदार विजय नरोत्तमदास अग्रवाल (वय ७१ रा. पश्चिम अपार्टमेंट, दादर) यांनी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एस. डी. भालेराव कन्स्ट्रशन प्रा. लि, एस. डी. भालेराव असोसिएट आणि मेसर्स क्राऊन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना मोठ्या परतीच्या रक्कमेचे अमिष दाखवून २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक करवून घेतली होती.

गुंतवणुकदारांना शासकीय नोंदणी करून रहिवासी सदनिका आणि व्यापारी गाळे देण्यात आले होते. त्याची बनावट कागदपत्रे बनवून ती कंपनीच्या मालकीचे असल्याचे भासवत सदनिका आणि व्यापारी गाळे दुसऱ्यांना विकण्यात आले. त्यातुन गुंतवणूकदरांची फसवणूक करण्यात आली. यातून २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपयांचा चुना गुंतवणुकदारांना लावण्यात आला.

फसवणूक झालेली २८ कोटी ५९ लाख १९ हजार ४७० रक्कम व्याजासह परत मिळावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. राबोडी पोलिसांनी आरोपी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे संजय भालेराव आणि प्रतिमा भालेराव यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:बँकेकडे तारण ठेवलेले सदनिका-गाळयांचे बनावट दस्त बनवून विक्री करीत गुंतवणूकदारा कोट्यवधींचा गंडा Body:

बिल्डर्स अँड डेव्हलोपर्सचे संजय भालेराव आणि प्रतिमा भालेराव यांनी गुंतवणूकदारांकडून बांधकाम व्यवसायात चांगल्या परताव्याचे अमिष दाखविले. गुंतवणूकदारांनी तब्बल २२ कोटी ६४ लाख ७५ हजार गुंतवणूक केले. गुंतवणूकदारांना नोंदणी करून देण्यात आलेल्या सदनिका आणि वाणिज्य गाळे बँकेकडे तारण ठेवल्यानंतर ते मालकीचे असल्याचे भासवून त्याचे बनावट कागदपत्र बनवून दुसऱ्याला गंडा घातल्याचे समोर आले. याबाबत राबोडी पोलीस ठाण्यात संजय आणि प्रतिमा भालेराव यांच्या विरोधात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राबोडी पोलीस अधिक तपास आहेत.

फिर्यादी विजय नरोत्तमदास अग्रवाल (७१) रा. पश्चिम अपार्टमेंट, कीर्ती कॉलेजच्या जवळ दादर यांनी राबोडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात एस डी भालेराव कन्स्ट्रशन प्रा. लि , एस डी भालेराव असोसिएट आणि मेसर्स क्राऊन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या कंपन्यांमध्ये बांधकाम व्यवसायात गुंतवणूकदारांना मोठ्या परतीच्या रक्कमेचे अमिश दाखवून २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक करवून घेतली. या गुंतवणूकदारांना शासकीय नोंदणी करून रहिवासी सदनिका आणि व्यापारी गाळे देण्यात आले. सादर गेले हे बँक ऑफ इंडिया कडे गहाण ठेवले. त्याच गेल्याचे बनावट कागदपत्र बनवून ती कंपनीच्या मालकीचे असलयाचे भासवीत सदनिका आणि व्यापारी गाळे हे दुसऱ्याला विकण्यात आले. अन गुंतवणूकदरांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणूकदारांना दिलेलय सदनिका आणि गाळे हे वारंवार बदलून ते विकले आणि २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला. सदर अफरातफरी केलेल्या रक्कमेच्या व्याजासह २८कोटी ५९ लाख १९ हजार ४७० रुपयांची रक्कम हि परत मिळावी अशी मागणी तक्रारदाराने आपल्या तक्रारीत राबोडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली आहे. राबोडी पोलिसांनी आरोपी बिल्डर्स अँड डेव्हलोपर्सचे संजय भालेराव आणि प्रतिमा भालेराव यांच्या विरोधात भादवी ४२०,४०६,४०८, ४६७, ४७१ आणि १२०(ब ) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.