ETV Bharat / state

ठाण्यात भाजप नगरसेवकाचा बारमधील झिंगाट डान्स व्हायरल - thane bjp

स्वत:ला सुसंस्कृत पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजप पक्षाचे नेते जर सार्वजनिक जीवनात असे वागत असतील तर हे धक्कादायक आहे.

बारमध्ये नाचताना विलास कांबळे
author img

By

Published : Apr 17, 2019, 2:39 PM IST

ठाणे - ठाण्यातील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे आणि वाद काही नवा विषय नाही. आता त्यामध्ये नव्या घटनेची भर पडली आहे. बारमध्ये झिंग झिंग झिंगाट गाण्यावर नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ बाहेर आला आहे. स्वत:ला सुसंस्कृत पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजप पक्षाचे नेते जर सार्वजनिक जीवनात असे वागत असतील तर हे धक्कादायक आहे. विलास कांबळे यांनी याआधी ठाणे महानगर पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषविले आहे.

नगरसेवक विलास कांबळे अनेकदा वादात सापडले आहेत. २०१७ साली पालिका निवडणुकीच्या आधी प्रभागातील अनेक नागरिकांना सहलीला घेऊन जाऊन त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला. बस मालकांचे लाखो रुपयांचे बिल दिले नाही याबाबत बस मालकाने पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच बारमध्ये तोडफोड केल्याचेही प्रकरण जुने नाही. आता तर चक्क झिंग झिंग झिंगाट गाण्यावर दारू पिऊन नाचताना ते दिसत आहेत. आपण नगरसेवक आहोत हे विसरून ते बारमध्ये गाचगाणे करत आहेत.

चार महिन्यांपूर्वी विलास कांबळे यांनी नंदादीप लेडीज बारमध्ये गायक प्रदीप गायकवाड यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. तसेच इनोव्हा कारची कायदेशीर नोंदणी न करता त्या कारला बनावट नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या कांबळेंसह दोघांवर काही दिवसांपूर्वी श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता.

भाजप हा संस्कारी पक्ष असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात भाजप नगरसेवकाचे हे कृत्य भाजप कार्यकरिणीला आणि भाजप नेत्यांना अडचणीत आणणारे आहे. या संदर्भांत कांबळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मोठ्या पदावर काम केल्यानंतर अशी कृत्य पालिकेची प्रतिमा देखील मलीन करत आहेत.

Intro:भाजप नगरसेवकाचा डान्स बार मध्ये झिंगाट डान्स व्हायरल Body:ओळखा कोण आहे हा ....हा आहे सुसंस्कृत पारदर्शी कारभार असलेल्या भाजपचा ठाण्यातील नगरसेवक विलास कांबळे हे महाशय अनेकदा वादात सापडले आहेत कधी निवडणुकीच्या आधी लोकांना अनेक बस करून देव दर्शन घडवून बस मालकाला बिल न दिल्यावर... त्यानंतर बार मध्ये तोडफोड केल्यावर आणि आता तर चक्क झिंग झिंग झिंगट गाण्यावर दारू पिऊन नाचताना हे दिसत आहेत....यांचे जुन्या गाण्यावर देखील खूप प्रेम आहे कधी कधी हे आपण नगरसेवक आहोत हे विसरून जाऊन बार मध्ये चक्क गाणी देखील गातात..... आहेत ना यांचे अच्छे दिन...
या आधी विलास कांबळे यांचे प्रताप

ठाणे महापालिकेतील वागळे इस्टेट येथील प्रभाग १५ ड चे भाजपाचे नगरसेवक विलास कांबळे यांनी मुलुंड चेकनाका येथे नंदादीप लेडीज बारमध्ये चार महिन्यांपूर्वी गायक प्रदीप गायकवाड याला मध्यरात्री त्याच्या हातातील माईक खेचून धक्काबुक्की आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली . याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे
या दरम्यान इनोव्हा कारची कायदेशीर नोंदणी न करता त्या कारला बनावट नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या भाजपा नगरसेवक विलास कांबळे यांच्यासह दोघांवर काही दिवसांपूर्वी श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता
या प्रकरणाच्या आधी 2017 पालिका निवडणुकीच्या आधी प्रभागातील अनेक नागरिकांना सहलीला घेऊन जाऊन त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला पण बस मालकांचे लाखो रुपयांचे बिल दिले नाही याबाबत बस मालकाने पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत
भाजप हा संस्कारी पक्ष असल्याचा सांगण्यात येतो मात्र प्रत्यक्षात भाजप नगरसेवकाचे हे कृत्य भाजप कार्यकरिणीला आणि भाजप नेत्यांना अडचनीत आणणारे आहे या संदर्भांत कांबळे यांच्याशी संवाद साधण्याची प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.विलास कांबळे यांनी या आधी ठाणे महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष पद भूषवले आहे अशा पदावर काम केल्यानंतर अशी कृत्य पालिकेची प्रतिमा देखील मलिन करत आहेत.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.