ETV Bharat / state

ठाण्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज .. - thane gram panchayat election

जिल्ह्यात सहा तालुक्यातमधील भिवंडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांवरून याच आठवड्यात ३ दिवसात ४ गंभीर गुन्हे घडल्याने तालुक्यातील मतदारांमध्ये भीतीचे वातारण पसरल्याचे पाहवयास मिळाले. अशातच १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रकियेसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ..

author img

By

Published : Jan 14, 2021, 1:31 PM IST

ठाणे- जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १५ ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ३४९ उमेदवार बिनविरोधात निवडून आले. आता उर्वरित जागेसाठी ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच जिल्ह्यात सहा तालुक्यातमधील भिवंडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांवरून याच आठवड्यात ३ दिवसात ४ गंभीर गुन्हे घडल्याने तालुक्यातील मतदारांमध्ये भीतीचे वातारण पसरल्याचे पाहवयास मिळाले. अशातच १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रकियेसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान ...

जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १४५ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. राजकीय वादविवादाच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय नेते, कार्यकर्ते या निवडणुकीत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्राणप्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच शुक्रवारी जाहीर प्रचाराचा कालावधी संपला असला तरी उमेदवार मतदारांच्या घरोघरी गुप्त भेटी घेत आहेत.

१ हजार ४७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ...

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यतील सहा तालुक्यातमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. यामध्ये ठाणे तालुक्यात ५ ग्रामपंचायती, कल्याण तालुक्यात २१, अंबरनाथ २७, मुरबाड ४४, शहापूर ५, तर सर्वाधिक भिवंडी तालुक्यात ५६ ग्रामपंचाती अशा सहा तालुक्यातून निवडणुकीसाठी ३ हजार ६४५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापौकी १७४ अर्ज बाद ठरले तर १ हजार २१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीत १ हजार ४७२ उमेदवार निवडणुकीच्या रींगणात असून आपले नशीब अजमावत आहेत.

जिल्ह्यात ९९६ मतदान केंद्र ...
१४३ ग्रामपंचायतीं मधील एकूण ९९६ मतदान केंद्रांवर येत्या १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ४७२ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आहे.पुरुष मतदार १लाख ६० हजार ४८० तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख ४४ हजार ४८० व इतर २ असे एकूण मतदार ३ लाख ४ हजार ९६२ मतदार मतदानासाठी सज्ज झाले आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

सर्वाधिक ग्रामपंचत निवडणूका भिवंडीत …

सहा तालुक्यामध्ये भिवंडी तालुक्यात जिल्हातील सार्वधिक ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे ५६ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या पैकी ३ ग्राम पंचायती बिनविरोध निवडून आल्याने आता ५३ ग्राम पंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती भिवंडीचे तहसील प्रशासनकडून देण्यात आली आहे. ५३ ग्राम पंचायतींमधील एकूण २०५ प्रभागांमध्ये या निवडणुका पार पडणार असून यापैकी ३० प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले असून १७५ प्रभागांमध्ये या निवडणुका होणार आहेत. ५६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ५७४ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १०५ जागांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याने ४६६ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी १०८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या ५३ ग्राम पंचायतींच्या ठिकाणी २१८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यासाठी १,२५० अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.