ETV Bharat / state

भिवंडीत पुराच्या पाण्यात टेंपो चालकासह कामगार गेले वाहून - टेंपो चालक

भिवंडीमध्ये पुराच्या पाण्यात दोघेजण वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी घडल्या आहेत. यातील एकजण टेंपो चालक व दुसरा कामगार होता.

भिवंडीमध्ये पुराच्या पाण्यात दोघेजण वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी घडल्या
author img

By

Published : Aug 5, 2019, 12:01 AM IST

ठाणे - भिवंडीमध्ये पुराच्या पाण्यात टेंपो चालक व कामगार असे दोघेजण वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी घडल्या आहेत. मोहम्मद सलाम शेख (३० रा.धापसी पाडा) असे पुरात वाहून गेलेल्या चालकाचे नाव आहे. कामगाराचे नाव समजू शकले नाही.

भिवंडीमध्ये पुराच्या पाण्यात दोघेजण वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी घडल्या
टेंपो चालक शेख हा वडपे बायपास येथील गोदामातून अमेझॉन कंपनीचा माल पोहोच करण्यासाठी वसई येथे चालला होता. तो पारोळ फाटा येथील पेट्रोल पंपालगतच्या रोडवरील मोरीवर असताना, अचानकपणे तुंगारेश्वर डोंगराच्या नाल्याचा पाण्याचा प्रवाह मोरीवरून वाहू लागला. त्या प्रवाहात चालक मो. शेख हा वाहून गेला.त्याने जीव वाचवण्यासाठी टेंपोतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय टेंपोत अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची नोंद विरार पोलीस ठाण्यात केली आहे. तर दुसरी घटना सरवली एमआयडीसी रोडवरील गोविंद नगर येथे घडली आहे. पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना घर गाठण्यासाठी तीन कामगार पाण्यातून रस्ता काढीत होते. स्थानिक नागरिकांनी या कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले, तर एकजण वाहून गेला. त्याचा शोध भिवंडी तालुका महसूल विभाग व कोनगाव पोलीस घेत आहेत. तहसीलदार शशिकांत शिंदे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला.

Intro:Body:

state

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.