ठाणे मध्ये रेल्वेच्या कल्याण कासरा मार्गावरील खर्डी रेल्वे स्थानकात khardi railway station दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूकीवर परिमाण झाला. त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले असून गेल्या पाऊण तासापासून दुरन्तो एक्स्प्रेस स्थानकात उभी असून इंजिन मधील तांत्रिक बिघाड दुरुस्ती शिवाय कसारा रेल्वे स्थाकानातुन दुसरे इंजिन मागविण्यात आले आहे. technical failure engine duranto express यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तासाचा कालावधी लागण्याची शक्यता central rail way traffic वर्तवली जात आहे.
रेल्वे वाहतूकीवर परिमाण मध्य रेल्वेच्या कल्याण कासरा मार्गावरील खर्डी रेल्वे स्थानकात दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूकीवर परिमाण झाला. त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले असून गेल्या पाऊण तासापासून दुरन्तो एक्स्प्रेस स्थानकात उभी असून इंजिन मधील तांत्रिक बिघाड दुरुस्ती शिवाय कसारा रेल्वे स्थाकानातुन दुसरे इंजिन मागविण्यात आले आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तासाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र विस्कळीत झालेली वाहतूक अखेर सव्वा दोन तासांनी पूर्वपदावर आली आहे.
खर्डी रेल्वे स्थानकात बिघाड नागपूरहून निघालेल्या दुरांतोच्या इंजिनमध्ये आज सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास खर्डी रेल्वे स्थानकात बिघाड झाला होता. मध्य रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र वेगळं इंजिन लावून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सव्वा दोन तासांच्या खोळंब्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुरांतो एक्प्रेसमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची रखडपट्टी झाली आहे.