ठाणे : कल्याण मधील वालधुनी नदी पुलावर टँकर उभा करुन नदी पात्रात पाईपमधून बेकायदा घातक रसायन सोडणाऱ्या (pouring hazardous chemicals into Valdhuni river ) टँकर चालकाला महात्मा फुले पोलिसांनी अटक (Tanker driver arrested) केली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा कुडुस येथील दोढिया कंपनीचा हा टँकर (Crime against Dodhia Chemtax Company) असून या कंपनीतील हायड्रोक्लोराईट सोल्युशन नावाचे घातक रसायन नदी पात्रात सोडण्यात (pouring hazardous chemicals into riverbed) येत असल्याने कंपनी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. नजर मोहम्मद मुल्ला अन्सारी ( वय ३२) असे अटक केलेल्या टँकर चालकाचे नाव आहे. Latest news from Thane, Thane Crime, Hazardous Chemicals Into Valdhuni River
रसायनांमुळे पसरली दुर्गंधी- शनिवारी (आज ) पहाटे अडीज वाजल्याचा सुमारास वालधुनी नदी पुलावर एक टँकर वालधुनी नदीत बेकायदा घातक रसायन सोडत असल्याने या घातक रसायनाने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याची माहिती उल्हासनगर मधील सामाजिक कार्यकर्ते पियुष वाघेला, नरेश साळवे, सत्यजित बर्मन यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वालधुनी नदीत एक टँकर घातक रसायन सोडत असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांना कळविले आणि घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
दोढीया कंपनी विरुध्द गुन्हा दाखल- पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पहाटे साडे तीन वाजता दाखल झाले. त्यानंतर टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक नजर मोहम्मद याने आपण वाडा कुडुस येथील दोढिया केमटॅक्स कंपनीतून हे रसायन आणले असल्याची कबुली पोलिसांना दिली. चालक नजर अन्सारी याच्याकडे महाड एमआयडीसीतील कोकण नवनाथ एन्टरप्रायझेस कंपनीेचे इनव्हाॅईस आढळून आले. या इनव्हाॅईसमध्ये २६ हजार ३७० किलोग्रॅम वजनाचे हायपोक्लोराईट सोल्युशन रसायन असल्याचे म्हटले आहे. घातक रसायनाने जलप्रदूषण होऊन जलचरांच्या जीविताला धोका निर्माण करते. मानवी जीविताला ते हानिकारक आहे हे माहिती असुनही चालक नजर याने ते वालधुनी नदी पात्रात आणून सोडले. दोढिया कंपनीमधील हे रसायन असल्याने पोलिसांनी चालक नजर, दोढीया कंपनी विरुध्द पर्यावरण, प्रदूषण कायद्याने गुन्हे दाखल करत टँकर जप्त करण्यात आला आहे.
वालधुनी नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर - वालधुनी नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील सात आमदारांनी या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. यावेळी राज्यसरकारकडून उचित कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पर्यावरण विभागाकडून या प्रकरणाकडे फारसे लक्ष दिले नाही. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास वालधुनी नदी किंवा या नदीला जोडणारे नाले यात विषारी रसायने रासायनिक कंपन्यांद्वारे किंवा टँकरद्वारे सोडले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होते. अनेक वेळा विषारी वायू हवेत पसरल्याने या आदीही नागरिकांना बाधा झाली आहे
नदीत घाण पाणी आणून सोडण्याचे प्रकार सुरूच- वापी, गुजरात, महाड, भिवंडी, वाडा, कुडुस भागातील काही कंपनी चालक तेथे उत्पादित रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च अधिक असल्याने, उत्पादित रासायनिक सांडपाणी कल्याण, डोंबिवली परिसरातील नदी, नाल्यांमध्ये रात्रीच्या वेळेत आणून सोडतात. मागील १५ वर्षांपासून हा गैरप्रकार सुरू आहे. एक मोठी टोळी यामागे सक्रिय असल्याचे सांगण्यात येते.