ETV Bharat / state

ठाणे : पाठलाग करणाऱ्या पोलिसावर गुंडांकडून तलवारीने प्राणघातक हल्ला - thane breaking news

गुन्हा करून पळून जाणाऱ्या चार गुन्हेगारांचा एक पोलीस पाठलाग करत होता. त्यावेळी पोलिसावर चार गुन्हेगारांनी भर चौकात तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Sword attack on police
पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला
author img

By

Published : Oct 24, 2020, 2:06 PM IST

ठाणे - गुन्हा करून पळून जाणाऱ्या चार गुंडांचा एक पोलीस पाठलाग करत होता. तेव्हा त्या गुंडांनी भर चौकात पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील मटका चौकात तलवारीने सपासप वार केल्याने तो पोलीस गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विशेष म्हणजे, अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हा सगळा थरारक प्रकार घडला आहे. बाळू चव्हाण असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तर, दिलखुश महेंद्र प्रताप सिंग, अंकुश महेंद्र प्रताप सिंग, युवराज नवनाथ पवार आणि आबिद अहमद शेख अशी हल्लेखोर गुंडांची नावे आहेत.

डोक्यात तलवारीने सपासप वार

बाळू चव्हाण हे उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते शुक्रवारी रात्री आपली ड्युटी संपवून घरी बदलापूरला निघाले होते. त्यावेळी अंबरनाथमधील मटका चौक भागात वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका कारमध्ये चार जण रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेले दिसले. त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी या चौघांचा पाठलाग करीत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चौघांनी कारमधून उतरून त्यांच्या डोक्यात तलवारीने सपासप वार केले.

विवेक पानसरे, पोलीस उपायुक

राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला

यानंतर कारच्या मागे असलेल्या एका रिक्षाचालकाला तलवारीचा धाक दाखवत त्याची रिक्षा घेऊन हे चौघे पसार झाले. या आरोपींनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाडी फोडली. तसेच एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला केला. उल्हासनगरच्या शिवाजी चौकात एक लाल रंगाच्या गाडीची काच फोडत चालकाचे अपहरण करून ते अंबरनाथला आले. त्यानंतर त्यांनी बाळू चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पळून गेलेल्या चारही गुंडांना अंबरनाथ, विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत उल्हासनगरमधून बेड्या ठोकल्या. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.