ठाणे - ठाण्यातील विटावा भागात राहणारी पॉवरलिफ्टींगपटू सुश्मिता सुनील देशमुख ( Sushmita Deshmukh Powerlifting ) हिने 18 ते 19 डिसेंबर 2021 रोजी इंदौर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया सीनियर पॉवरलिफ्टिंग ( Western India Senior Powerlifting ) स्पर्धेत 52 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मान असलेले स्ट्रॉग वुमेन ऑफ वेस्टर्न इंडिया 2021 हा खिताब आपल्या नावावर केला.
सुश्मिता ही कल्याणच्या कारभारी जिम्नशियम क्रीडा मंडळ कल्याण येथे सराव करते. तिने या यशाचे श्रेय प्रशिक्षक विनायक जयराम कारभारी तसेच जिममधील तिचे सहकारी खेळाडू व तिच्या आई वडिलांना दिला. सुश्मिताचे सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा - ED summoned Aishwarya Rai Bachchan : अखेर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दिल्लीतील 'ईडी' कार्यालयातून बाहेर
हेही वाचा - Local Body Elections Bhandara : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना