ETV Bharat / state

कल्याण लोकसभेत २८; तर भिवंडीतून १५ उमेदवार रिंगणात - कल्याण लोकसभा मतदार संघ

शिवसेना जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे आणि काँग्रसेचे २०१४ चे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनीदेखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या तुल्यबळ उमेदवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न मागील दोन दिवसांपासून सुरू होते. आज अखेर या प्रयत्नांना यश आले असून पाटील, म्हात्रे आणि कथोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप- काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील उमेदवार
author img

By

Published : Apr 12, 2019, 11:14 PM IST

ठाणे - कल्याण लोकसभा मतदार संघातून ३२ उमेदवारांपैकी ४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे कल्याण लोकसभेसाठी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत, तर भिवंडी लोकसभा मतदार संघातून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह काँग्रेसचे २०१४ चे उमेदवार विश्वनाथ पाटील आणि योगेश कथोरे यांनी आज माघार घेतली आहे. त्यामुळे भिंवडी लोकसभा मतदारसंघात १५ उमेद्वारांमध्ये लढत होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३८ उमेदवारांपैकी ४ उमेदवारचे अर्ज बाद झाले होते, तर उर्वरित ३२ उमेदवारांपैकी ४ जणांनी अर्ज मागे घेतले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. देवेंद्र सिंग, ज्योतिराम सरोदे, देवेंद्र सिंग आणि संदेश इंगळे या ४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, वंचित आघाडीचे संजय हेडावू यांच्यासह तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे जड मानले जात आहे.

सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह काँग्रेसचे २०१४ चे उमेदवार विश्वनाथ पाटील आणि योगेश कथोरे यांनी आज माघार घेतली आहे. भिंवडी लोकसभेत १५ उमेद्वारांमध्ये लढत होणार आहे. या मतदार संघातून भाजपच्या कपिल पाटील यांच्या विरोधात माजी खासदार सुरेश टावरे काँग्रेसकडून लढत आहेत. शिवसेना जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे आणि काँग्रसेचे २०१४ चे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनीदेखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या तुल्यबळ उमेदवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न मागील दोन दिवसांपासून सुरू होते. आज अखेर या प्रयत्नांना यश आले असून पाटील, म्हात्रे आणि कथोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप- काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण लोकसभेत २८; तर भिवंडीतून १५ उमेदवार रिंगणात

ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघातून ३२ उमेदवारा पैकी ४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामूळे कल्याण लोकसभेसाठी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. तर भिवडी लोकसभा मतदार संघातून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह कॉंग्रेसचे २०१४ चे उमेदवार विश्वनाथ पाटील आणि योगेश कथोरे यांनी आज माघार घेतली असून भिंवडी लोकसभेत १५ उमेद्वारामध्ये लढत होणार आहे.

 कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३८ उमेदवारा पैकी ४ उमेदवारचे अर्ज बाद झाले होते तर उर्वरित ३२ उमेदवारा पैकी ४ जणांनी अर्ज मागे घेतले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघात
डॉ देवेंद्र सिंग, ज्योतिराम सरोदे, देवेंद्र सिंगआणि संदेश इंगळे या चार उमेदवारांनी माघार घेतली असून कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे ,राष्ट्रवादी चे बाबाजी पाटील ,वंचित आघाडीचे संजय हेडावू यांच्यासह तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या मतदारसंघात डॉ श्रीकांत शिंदे यांचे पारडे जड मानले जात आहे.

भिवडी लोकसभा मतदार संघातून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह कॉंग्रेसचे २०१४ चे उमेदवार विश्वनाथ पाटील आणि योगेश कथोरे यांनी आज माघार घेतली असून भिंवडी लोकसभेत १५ उमेद्वारामध्ये  लढत होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघातुन भाजपच्या कपिल पाटील यांच्या विरोधात माजी खासदार सुरेश टावरे कॉंग्रसे कडून लढत  आहेत. दरम्यान  शिवसेना जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे आणि काँग्रसेचे २०१४ चे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या तुल्यबळ उमेदवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न मागील दोन दिवसापासून सुरु होते आज अखेर या प्रयत्नांना यश आले असून पाटील, म्हात्रे आणि कथोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपा - कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार  असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.