नवी मुंबई (ठाणे) - वास्तूविषारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक न्यूजचे मुख्य संपादक अर्णब नाईक यांना आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठानं अर्णव गोस्वामी यांना अंतरिम जामीन देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयासमोर ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी अर्णव गोस्वामींची बाजू मांडली होती. अर्णव यांना जामीन मिळाल्यानंतर अर्णब समर्थकांनी तळोजा जेल बाहेर गर्दी करून आनंद व्यक्त केला.
50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर-
वास्तूविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी त्यांच्या मुंबईतील घरातून अटक केली होती. त्यानंतर अलिबाग न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने अर्णब यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर अर्णब यांची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर अर्णब यांनी मंगळवारी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने आज अर्णब गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला
मुंबई उच्च न्यायालयाने चूक केली-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे यावर रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अंतरिम जामिनासाठी अर्णब गोस्वामींचा अर्ज नामंजूर केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने चूक केली, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. अर्णब यांना जामीन मंजूर झाल्यामुळे अर्णब यांच्या आंनदी झालेल्या चाहत्यांनी जल्लोष करत भारत माता की जयची घोषणाबाजी केली. तसेच त्यांची आज तळोज कारागृहातून सुटका होणार असल्याने कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दृश्य पाहायला मिळाले.