ठाणे - वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सुनील भगत यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांबरोबरच विविध आंदोलनांमध्ये सुनील भगत यांनी केलेल्या परिश्रमाची दखल वंचित बहुजन आघाडीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली असून नुकताच त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
वंचितचे नेते डॉ. अरुण सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सुनील भगत यांची दुसऱ्यांदा नियुक्ती जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस अन् राष्ट्रवादीला बसणार फटका
ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका व नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वंचितचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे वंचितने जाहीर केले आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला याचा फटका बसणार असल्याचे जाणकाराने सांगितले. जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वंचीतची बऱ्यापैकी जनाधार असल्याने या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण विशेष परिश्रम घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिली आहे.
हेही वाचा - ठाण्यातील वाहतुकीला ‘एलआरटी’चा पर्याय, सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित
हेही वाचा - अंबरनाथ : मोटरमॅनच्या प्रसंगावधानामुळे मृत्यूला 'ब्रेक'