ETV Bharat / state

प्रविण चौगुलेचा मृत्यू निष्ठेपोटी की मानसिक तणावातून? - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या जवळचा होता. राज ठाकरे यांना नोटीस आल्यापासून आपण तणावात असल्याची भावना त्याने आत्महत्या करण्यापूर्वी शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखांकडे व्यक्त केली होती. मंगळवारी दिवसभर त्याने त्याच्या फेसबुक वॉलवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपशब्द वापरुन पोस्ट लिहिल्या होत्या.

प्रवीण चौगुलेचा मृत्यू निष्ठेपोटी की मानसिक तणावातून?
author img

By

Published : Aug 21, 2019, 4:54 PM IST

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे कट्टर मनसैनिक असलेल्या प्रविण चौगुले (वय 27) या तरुणाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. मात्र, प्रविणला दारूचे व्यसन होते. त्याने यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रविण मानसिकरित्या कमकुवत होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

प्रविण चौगुलेचा मृत्यू निष्ठेपोटी की मानसिक तणावातून?

प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या जवळचा होता. राज ठाकरे यांना नोटीस आल्यापासून आपण तणावात असल्याची भावना त्याने आत्महत्या करण्यापूर्वी शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखांकडे व्यक्त केली होती. मंगळवारी दिवसभर त्याने त्याच्या फेसबुक वॉलवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपशब्द वापरुन पोस्ट लिहिल्या होत्या. प्रविणने फेसबुकवर ईडीच्या विरोधात पोस्ट टाकून आत्महत्या केल्याने मनसैनिक चांगलेच संतापले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी "नेत्याच्या प्रेमापोटी जीव देणे हे सोपे नाही. फार कमी नेत्यांच्या भाग्यात असे कार्यकर्ते लाभतात. त्यामुळे प्रविण चौगुले आणि भाग्यवान नेते राज ठाकरे या दोघांनाही सलाम." अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, प्रविणने २०१५ मध्ये हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने फाशी घेण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातही त्याने अंगावर राॅकेल ओतुन पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या सर्व घटना पाहता आत्महत्येमागे 'राज ठाकरेंना आलेली ईडीची नोटीस' हे कारण वाटत नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रविण पवार यांनी दिली आहे. परंतु, घटनेची चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

Intro:ठाण्यातील आत्महत्येवरून नागरिकांमध्ये रोष Body:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान विटावा परिसरात घडली आहे. प्रवीण चौगुले (27) असे या तरुणाचे नाव असून प्रवीणने आपल्या राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतले .यामध्ये तो ८० टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला . प्रवीण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा जवळचा होता. राज ठाकरे यांना नोटीस आल्यापासून आपण तणावात असल्याची भावना त्याच्याच परिसरात राहणारे शिवसेनेचे उपशाखाप्रमुखांकडे त्याने भावना व्यक्त केली होती. आई वडील यापूर्वीच वारले असल्याने प्रवीण हा घरात एकटाच राहत होता. पोलिसांनी मात्र प्रवीणने यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला होता अशी माहिती दिली असून नेमके आत्महत्येचे कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत . आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर ईडीच्या विरोधात अपशब्दामध्ये पोस्ट केली होती.
राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यापासून महाराष्ट्रासह मुंबई तसेच ठाण्यातील मनसैनिक कमालीचे संतप्त झाले आहे . त्यात विटावा परिसरातील एकवीरा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रवीण चौघुले या फेसबुकवर ईडीच्या विरोधात पोस्ट टाकून आत्महत्या केल्याने वातारण अजून तापले आहे . “राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे मी दु:खावलो असून आत्महत्या करतोय,” असं प्रवीणने आत्महत्येपूर्वी आधी उपशाखाप्रमुखाना सांगितले होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान त्याने स्वत:ला पेटवून घेतले. त्याने आत्महत्या केल्याचे कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ८० टक्के भाजल्याने त्याचा यामध्ये मृत्यू झाला . त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दिवसभरात त्याने त्याच्या फेसबुकवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपशब्द वापरुन पोस्ट लिहिल्या आहेत.
प्रवीण हा ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता. मनसेच्या अनेक कार्यक्रमात, मोर्चा किंवा आंदोलनात प्रवीण सहभागी असायचा. प्रत्येक मोर्चात प्रविण मनसेचा झेंडा त्याच्या शरीरावर रंगवायचा. तसेच स्थानिक नेत्यांच्याही तो फार जवळचा होता. त्याने फेसबुकवर मनसेच्या नेत्यांसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे मनसैनिकांना फार मोठा धक्का बसला आहे.

प्रवीणला दारूचे व्यसन होते त्याचप्रमाणे त्याने यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला आहे. प्रविण मानसिक रित्या कमकुवत होता हे त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी सांगितले आहे . त्याने २०१५ मध्ये हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, २०१९ फेब्रुवारी मध्ये फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि २०१९ एप्रिल मध्येच अंगावर राॅकेल ओतुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता . अजून तरी त्याच्या आत्महत्येमागे मनसेचे कारण वाटत नाही, पण आमची चौकशी सुरू आहे, त्याच्या आईने देखील आत्महत्या केली होती, त्याचा परिणाम त्याच्यावर होता, त्याला आजार देखील होता, कळव्यात तो घरी एकटा राहायचा, ओला गाडी चालवायचा
Byte - प्रविण पवार, पोलीस अतिरिक्त आयुक्त, ठाणे

भारतीय जनता पार्टीच्या घाणेरड्या राजकारणाचा हा बळी आहे . सर्व मनसैनिकांचा तळतळाट या सरकारला लागणार आहे . माझे सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे कि कुणीही अशा प्रकारच्या टोकाचे पाऊल उचलू नये.
byte - संदीप देशपांडे , नेते, मनसे

महाराष्ट्र्रात सत्तेच्या राजकारणासाठी एकीकडे पक्ष सोडून जात आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्यावर आई वडिलांसारखे प्रेम करणाऱ्या प्रवीण चौघुले. नेत्याच्या प्रेमापोटी जीव देणे हे सोपे नाही . फार कमी नेत्यांच्या भाग्यात असे कार्यकर्ते लाभतात . त्यामुळे प्रवीण चौघुले याला देखील सलाम आणि भाग्यवान नेते असलेले राज ठाकरे यांना देखील सलाम
Byte - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रावादी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.