ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, उद्यापासून कठोर निर्बंध लागू

author img

By

Published : Mar 10, 2021, 9:36 PM IST

Updated : Mar 10, 2021, 11:05 PM IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून पालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध उद्यापासून (दि. 11 मार्च) जाहीर करण्यात आले. यामध्ये दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न व हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

corona
संग्रहित छायाचित्र

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून पालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध उद्यापासून (दि. 11 मार्च) जाहीर करण्यात आले. यामध्ये दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेसह लग्न व हळदी समारंभांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तर हे टाळेबंदी नसून निर्बंध लागू करण्यात आल्याचेही यावेळी पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

माहिती देताना आयुक्त

पालिकेसह पोलीस प्रशासनही उद्यापासून सज्ज

कल्याण डोंबिवलीमध्ये आज (दि. 10 मार्च) कोरोनाग्रस्तांचा आकडा आला व सर्वच प्रशासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. आज कल्याण डोंबिवलीमध्ये 392 नवे कोरोनाग्रस्त आढळले. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजेच 5 महिन्यांनंतर येथील कोविड रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद

उद्या असणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व शिव मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार. केवळ पूजा करण्यासाठी ही मंदिरे उघडली जाणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) असणारे कोविड रुग्ण सर्रासपणे फिरत असल्याचे आढळून आले असून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे. असे रुग्ण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये उद्यापासून हे असतील निर्बंध

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंतच सुरू ठेवणे.
  • शनिवार आणि रविवारी पी1-पी2 नूसार दुकाने सुरू ठेवणे.
  • खाद्यपदार्थ आणि इतर हातगाड्या संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी असेल.
  • हॉटेल्स-रेस्टॉरंट-बार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवणे.
  • पोळीभाजी केंद्र 9 वाजेपर्यंत सुरू राहणार.
  • पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार.
  • भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणार.
  • लग्न- हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक लोकं नकोत, जास्त लोकं असल्यास गुन्हे दाखल होणार.
  • लग्न हळदी समारंभ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी, मास्क घातलेच पाहिजेत.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू आणि वराच्या पित्यासह हॉल व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

हेही वाचा - डोंबिवली; इमारतीमधील बंद घराला भीषण आग, आगीत घर जळून खाक

हेही वाचा - इसिसमध्ये दाखल झालेला 'तो' तरुण कल्याणला परतला

Last Updated : Mar 10, 2021, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.