ठाणे - राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी दिली असून त्यासाठी दोन लस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करता येणार आहे. त्या आधारे सामान्य नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. यासाठी प्रवाशांची कागदपत्रे तपासून त्यांना क्यूआर कोड उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.
क्यूआर कोडनंतरच तिकीट किंवा मासिक मिळणार
क्यूआर कोड मिळविण्यासाठी प्रवाशांना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व आधारकार्डचे झेरॉक्स लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच प्रवाशांना क्यूआरे कोड दिला जाईल. त्यानंतर प्रवासी तिकीट किंवा मासिक पास काढू शकणार आहेत.
सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू आहे पास देण्याचे काम
सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत हे पास देण्याचे काम सुरू असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलचा प्रवास 15 ऑगस्टपासूनच सुरू होणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्याच्या दृष्टीकोणातून लोकल प्रवासासाठी काही नियम आणि निर्बंध घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र प्रवाशांची फक्त पडताळणी सुरू झालेली आहे. ज्यांचे रजिस्टेशन पूर्ण झालेले आहे. त्यांना 15 ऑगस्टपासून रेल्वे पास मिळणार आहे. आजपासून पालिकेकडून पडताळणी सुरू झालेली आहे.
हेही वाचा - दिल्लीच्या बंटी बबलीचा ठाण्याच्या कल्पनाला 3 लाखाला गंडा; सुखासाठी दिला 'हा' सल्ला अन्...