ETV Bharat / state

कल्याणामध्ये 'फातिमा मंजिल' इमारतीचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली - भाग कोसळला

कल्याणमधील रामबाग परिसरात 30 वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या फातिमा मंजिल या लोडबेरिंग धोकादायक इमारतीचा काही भाग आज दुपारी 2 वाजता कोसळला.

कल्याणामध्ये 'फातिमा मंजिल' इमारतीचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:43 PM IST

ठाणे - कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरातील फातिमा मंजिल या धोकादायक इमारतीचा काही भाग आज दुपारच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या इमारतीमध्ये 15 ते 20 कुटूंब राहत असून सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी टळली आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कल्याणामध्ये 'फातिमा मंजिल' इमारतीचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

कल्याणमधील रामबाग परिसरात 30 वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या फातिमा मंजिल या लोडबेरिंग धोकादायक इमारतीचा काही भाग आज दुपारी 2 वाजता कोसळला. इमारतीचे मालक आयुब शेख यांनी इमारत खाली करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, रहिवाशांनी इमारत खाली केली नाही. महापालिकाकडून इमारत खाली करून रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु महापालिकेकडूनही तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

पावसाळ्याच्या तोंडावर पालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. या इमारतीचेही यामध्ये नाव आहे. तरी देखील या इमारतीत राहणारे रहिवासी आपला घरावरील कब्जा गमावण्याच्या भीतीने धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

दरम्यान, 3 दिवसापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने 191 अतिधोकादायक आणि 282 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करत संबंधित इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजावून इमारत खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजही धोकादायक इमारतींमध्ये अनेक कुटुंब जीव धोक्यात घालून राहत आहेत.

तर पालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्याशी संपर्क साधला असता, या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. इमारत तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून फातिमा इमारतीशेजारील इमारतीमधीलही रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगितले असल्याची माहिती पवार यांनी दिली.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:कल्याणात फातिमा मंजिलचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

ठाणे :- कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरातील फातिमा मंजिल या धोकादायक इमारतीचा काही भाग आज दुपारच्या सुमाराला कोसळल्याची घटना घडली आहे, या इमारतीमध्ये पंधरा ते वीस कुटुंब राहत असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे, मात्र या दुर्घटनेमुळे पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे,
कल्याणातील रामबाग परिसरात तीस वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या फातिमा मंजिल या लोडबेरिंग धोकादायक इमारतीचा काही भाग आज दुपारी दोन वाजता कोसळला, या इमारतीमध्ये 15 कुटुंब वास्तव करीत आहेत त्या इमारतीचे मालक आयुब शेख यांनी इमारत खाली करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र रहिवाशांकडून इमारत खाली केली जात नाही , महापालिका इमारत खाली करून रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मात्र महापालिकेकडुनही प्रयत्न होताना दिसून येत नाही, पावसाळ्याच्या तोंडावर पालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जात असली तरी या इमारतीत राहणारे रहिवासी देखील आपल्या घरावर कब्जा गमावण्याच्या भीतीने या धोकादायक आपल्या कुटुंबाचे जीव मुठीत घेऊन राहत आहेत, वारंवार मागणी करूनही मालकाने भाडोत्री यांच्यातील वितुष्ट सोडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पुढाकार घेतला जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे,
दरम्यान तीन दिवसापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे ावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने 191 अतिधोकादायक आणि 282 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करत संबंधित इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा बजावून इमारत खाली करण्याचे आदेश दिले होते मात्र आजही अनेक इमारतींमध्ये अनेक कुटुंब जीव धोक्यात घालून राहत आहेत तर पालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांचे संपर्क साधला असता या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहेत इमारत तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून सुरक्षिततेची खबरदारी म्हणून फातिमा शेजारील इमारतीमधील रहिवाशांना देखील इमारत रिकामी करण्यास सांगितले आल्याची माहिती त्यांनी दिली,
ftp foldar -- tha, kalyan building 1.7.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.