नवी मुंबई - भटक्या श्वानांना जेवायला घालाल तर खबरदार! दंड ठोठावला जाईल, असा अजब फतवा नवी मुंबईतील पाम बीच रोडवर असलेल्या एनआरआय कॉम्प्लेक्स या सोसायटीत काढला आहे. नियमांचे उल्लंघन करून भटक्या श्वानांना (Food for stray dogs) जेवायला घालणाऱ्या एका महिलेला चक्क ८ लाखांचा तर दुसऱ्या महिलेला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सोसायटीचा अजब फतवा -
नवी मुंबईत पामबीच रोडवर एनआरआय कॉम्प्लेक्स या सोसायटीचा परिसर ४५ एकर इतका आहे. या सोसायटीमध्ये ४० इमारती आहेत. या सोसायटीच्या आवारामध्ये जवळपास ३० ते ३५ भटके श्वान (कुत्री) फिरत आहेत. सोसायटी मधील भटक्या कुत्र्यांना अन्न खायला दिल्यास दंड ठोठावण्यात येईल, असा नियम सोसायटीच्या माध्यमातून काढला गेला. या प्रकरणी लाखो रुपयांचा दंड श्वानप्रेमींना लावण्यात आला आहे.
नवी मुंबईतील एका सोसायटीचा अजब फतवा.. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या महिलेला ८ लाखांचा दंड - कुत्र्यांना अन्न देणाऱ्या महिलेला आठ लाखांचा दंड
भटक्या कुत्र्यांना खायला (Food for stray dogs) घातल्यामुळे श्वानप्रेमीला लाखोंचा दंड ठोठावण्याचा अजब प्रकार नवी मुंबईतील एका सोसायटीत समोर आला आहे. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर असलेल्या एनआरआय कॉम्प्लेक्स या सोसायटीने हा अजब फतवा काढला आहे. नियमांचे उल्लंघन करून भटक्या श्वानांना जेवायला घालणाऱ्या एका महिलेला चक्क ८ लाखांचा तर दुसऱ्या महिलेला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
![नवी मुंबईतील एका सोसायटीचा अजब फतवा.. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या महिलेला ८ लाखांचा दंड Food for stray dogs](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13942701-37-13942701-1639821109588.jpg?imwidth=3840)