ETV Bharat / state

Smuggled Mobile Phone Selling : भारतीय फोन बाजारात तस्करीच्या मोबाईलची सर्रास विक्री, जाणून घ्या कशी होते स्मग्लिंग - Smuggling Mobile Phones Without Import Duty

सरकारी कर हा टाळून आता चक्क मोबाईल फोनतची स्मग्लिंग (Smuggling Mobile Phones Without Import Duty) वाढलेली आहे. भारताबाहेर असलेल्या मोबाईलच्या किमती आणि भारतात इम्पोर्ट ड्युटी भरून असलेली किंमत यात तफावत असल्यामुळे मोबाईल स्मगलिंग (Mobile phone smuggling India) करणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. (thane crime), (thane latest news)

Smuggled Mobile Phone Selling
तस्करी मोबाइल विक्री
author img

By

Published : Oct 31, 2022, 4:54 PM IST

ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोबाईलच्या किमती आणि त्यावर असलेला सरकारी कर हा टाळून आता चक्क मोबाईल फोनतची स्मग्लिंग (Smuggling Mobile Phones Without Import Duty) वाढलेली आहे. भारताबाहेर असलेल्या मोबाईलच्या किमती आणि भारतात इम्पोर्ट ड्युटी भरून असलेली किंमत यात तफावत असल्यामुळे मोबाईल स्मगलिंग (Mobile phone smuggling India) करणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेला हा तस्करीचा व्यवसाय आजही सुरू आहे. (thane crime), (thane latest news)

इम्पोर्ट ड्युटी चूकवून मोबाइल फोनची स्मग्लिंग कशी होते याविषयी माहिती

तस्करीतील मोबाईलची बाजारात सर्रास विक्री - जर आपण महागडे मोबाईल वापरणारे असाल तर भारतामध्ये असलेल्या मोबाईलच्या किमती आणि विदेशात असलेल्या किमती याची तफावत आपल्याला माहितीच असेल .यावर आता तस्करांनी चांगलीच साठ-गाठ करून भारताबाहेरून फोन तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे लाखाच्या आसपास असलेल्या किमतीचे फोन भारतात दीड लाखाच्या आसपास मिळत असल्यामुळे तस्करी करून हे मोबाईल विकले जात आहेत. एअरपोर्टवरून किंवा समुद्रमार्गे येत असताना हे मोबाईल फोन्स रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यापैकी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही साठ-गाठ सुरू आहे. जास्त पैसे कमावण्याच्या नादात मोबाईल फोन विक्रेते असे महागडे फोन्स बाजारात उपलब्ध नाहीत, असे ग्राहकांना सांगतात आणि मग दुसरा पर्याय म्हणून तस्करी केलेले असे फोन्स ग्राहकाला वाढीव किंमतीत देतात आणि मोठा नफा कमावतात.

भारताचा महसूल बुडतोय - इम्पोर्ट ड्युटी न चुकवता भारतात आलेले हे लाखो रुपयांचे फोन भारताच्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करणारे आहेत. कारण यावर असलेली इम्पोर्ट ड्युटी न भरून हे फोन येत असल्यामुळे भारताच्या तिजोरीला इम्पोर्ट ड्युटीचा तोटा सहन करावा लागत आहे.

मोठे रॅकेट कार्यरत - दररोज वेगवेगळे यंत्रणांकडून सोन इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळ मोबाईल फोन जप्त जरी करत असले तरी यामागे कार्यरत असणारे रॅकेट हे खूप मोठे आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. त्यामुळे आजही बाजारात इम्पोर्ट ड्युटी न भरता करोडो रुपयांचा माल येतो आणि त्याला ग्राहक देखील मिळतात.

नेहमीचा प्रवास करणारे असतात ड्युटी चुकवणारे - इम्पोर्ट ड्युटी न भरता भारताचे आर्थिक नुकसान करणारे हे लोक नेहमी प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे ते वेगवेगळ्या गोष्टींची ज्ञान करतात आणि यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला देखील मिळवतात. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अनेकदा सिमेंट स्टार्स क्रिकेट कला क्षेत्रातील मान्यवर ही पाहायला मिळत आहेत.

कमिशन बेस वरती चालते काम - ड्युटी चुकवून आलेल्या मालावरती एक फिक्स कमिशनचा रेट असतो. हा रेट तस्कर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने आधी ठरतो आणि त्यानंतर तस्करी सुरू होते. तस्करीमध्ये जेवढा माल जास्त तेवढा अधिकाऱ्यांना मलिदा जास्त आणि तस्करांचे उत्पन्न तेवढेच जास्त अशाच प्रकारच्या आयडियाचा वापर करून तस्कर आपला व्यवसाय सुरू ठेवत आहे.

कठोर कारवाईची आवश्यकता - आता अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये आणखीन कठोरता आणली तर अशा प्रकारच्या तस्करींना रोखता येऊ शकते. असे जाणकार सांगत आहेत असे झाल्यास भारताचा उत्पन्न देखील वाढू शकत आणि तस्करीला आळा देखील घालता येऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.