ETV Bharat / state

ठाण्यात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेची 'स्मार्ट सहेली' योजना - ठाणे मध्य रेल्वे बातमी

महिला प्रवाशांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने 'स्मार्ट सहेली' या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे महिलांचे ८४ व्हॉट्सअ‍ॅप समूह स्थापन केले जाणार असून महिलांच्या समस्या व सूचना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे घेतल्या जाणार आहे.

smart saheli scheme for womens by central railway
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेची 'स्मार्ट सहेली' योजना
author img

By

Published : Dec 23, 2020, 7:23 PM IST

ठाणे - लोकल प्रवासादरम्यान महिला प्रवाशांची सुरक्षा आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने ‘स्मार्ट सहेली’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे महिलांसाठी व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात येत आहे. महिला प्रवासी, स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटना, महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन ८४ व्हॉट्सअ‍ॅप समूह स्थापन केले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

प्रताप सिंह यांची प्रतिक्रिया

महिला प्रवाशांसाठी तीन प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप -

मध्य रेल्वे उपनगरी स्थानकातून प्रवास करताना महिला प्रवाशांना छेडछाड, विनयभंग, मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागते. याशिवाय आसनांवर अन्य प्रवाशांना बसू न देणे, डब्यात प्रवेश करू न देणे आदी प्रकारही होतात. यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षा दलाच्या मदतीने 'स्मार्ट सहेली' योजना आखली आहे. टाळेबंदीच्या आधी मध्य रेल्वे उपनगरी गाड्यांच्या दररोज १७७४ फेऱ्यांतून ४५ लाख प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये १३ लाख महिला प्रवासी आहेत. या महिला प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘सेक्टर सहेली’, ‘स्टेशन सहेली’, ‘ट्रेन सहेली’ असे तीन प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सामाजिक संस्था, महिला प्रवासी संघटनांबरोबरच विविध क्षेत्रांत व कार्यालयात काम करणाऱ्या महिला, रेल्वे सुरक्षा दलातील महिला कर्मचारीही असतील.

समस्या व सूचना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे घेतल्या जाणार -

सुरुवातीच्या ते शेवटच्या स्थानकापर्यंत दररोज प्रवास करणाऱ्या गर्दीच्या स्थानकांवर चढणाऱ्या व उतरणाऱ्या महिलांचा यात समावेश असेल. यामध्ये कसारा, टिटवाळा, कल्याण, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा, सीएसएमटी, वडाळा रोड, मानखुर्द, बेलापूर, तुर्भे, पनवेल स्थानकांतून प्रवास करणाऱ्या महिला असतील. त्यांच्याकडून प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या व सूचना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे घेतल्या जाणार आहे.

महिला प्रवाशांचे प्रश्न सुटण्यास मिळणार मदत -

पाच महिला सुरक्षा कर्मचारी तसेच गर्दीच्या स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या १५ महिलांचा एक समूह असे २१ व्हॉट्सअ‍ॅप समूह बनवले जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने सांगितले आहे. या स्थानकांवर महिला रेल्वे सुरक्षा दलाची २४ तास नजर असेल. सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दोन आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर दोन अशा चार महिला विशेष लोकल फेऱ्या आहेत. त्यांच्यासाठीच्या चार समूहांमध्ये नियमित प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीतील २५ महिला प्रवासी असतील. हे गट रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाशी जोडले जातील. सूचना आल्यानंतर तत्काळ मदतही पोहोचवली जाणार आहे. एकूण ८४ व्हॉट्सअ‍ॅप समूह बनवले जाणार असून त्यांचे ७ हजार ८०१ महिला सदस्य बनण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाने अशा पाच हजार महिलांना सदस्य बनवले असल्याची माहिती मध्ये रेल्वेने दिले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे.

हेही वाचा - आजचा शेतकरीदिन शेतकऱ्यांसाठी इतिहासातील काळा दिवस - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.