ठाणे - देशासाठी बलिदान देणारे सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंदचा नारा देत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जय हिंदचा नारा सोडून जिओचा नारा देत आहेत. मात्र, हे त्यांच्या पदाला न शोभणार आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी केली.
हेही वाचा - कॉंग्रेसच्या निवडून येणाऱ्या मतदारसंघात समाजवादी पक्षाची नेहमीच 'टांग' -सुरेश टावरे
येचुरी हे शहापूर तालुक्यातील खर्डी येथे शहापूर विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार कॉम्रेड कृष्णा भवर यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना पंतप्रधान मोदींवर टीका केली. जिओ बाजारात येण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी त्यांची जाहिरातबाजी केली. विशेष म्हणजे जिओ सोडून सर्वच कंपन्यांचे नेटवर्क बंद होत चालले आहेत. याविषयी आम्ही राज्यसभेतही आवाज उठवला होता, असे यावेळी येचुरी म्हाणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड अन् मनसेच्या अविनाश जाधवांना गोविंदा पथकांचा पाठींबा
दरम्यान, येचुरी यांनी महाराष्ट्रातील भाजप शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचाही समाचार घेतला. हे दलबदलू आमदार, नेते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले असून त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नाही. तर देशातील सध्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आव्हानांविषयी त्यांनी सरकारच्या धोरणांचाही सडकून समाचार घेतला.