ETV Bharat / state

Shivsena Party Worker Join Shinde Group : शिवसंवाद यात्रेआधीच भगदाड; नाशिकमधील कार्यकर्ते शिंदे गटात दाखल - नाशिकमधील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रे आधीच नाशिकमधील 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सर्वांनी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.

Shivsena Party Worker Join Shinde Group
नाशिकमधील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश
author img

By

Published : Feb 6, 2023, 8:47 PM IST

नाशिकमधील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

ठाणे : आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या आधीच शिंदे गटाचा उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आज नाशिक जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक,माजी नगरसेवक, पदाधिकारी असे एकूण 50 हुन जास्त कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

यामुळे केला शिंदे गटात प्रवेश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत या सर्वानी प्रवेश केला. ज्यांनी शिवसेना जिल्ह्यात रुजवली वाढवली आशा शिवसैनिकांसोबत आनंद दिघे यांचे जुने सहकारी देखील यात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.

अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार : एकीकडे शिवसेनेचे अनेक नेते संपर्कात असल्याचे वारंवार शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते त्या दिवशी पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेची सत्ता हातात घेण्याचा प्रयत्न : महापालिका निवडणुकीच्या आधी पलिकेवरील सत्ता ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होणार आहे. आता सध्या पलिकवर पूर्ण सत्ता शिंदे गटाची आहे ही सत्ता हलवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस कडून केला जात आहे. त्यातूनच ठाण्यात काही महिन्यांपासून राजकीय नाट्य सुरू आहे.
हेही वाचा : Dr Pravin Togadia Sabha Amravati : तोगडियांचे राम मंदिरासंदर्भात मोठे वक्तव्य, उद्या काय बोलणार याची उत्सुकता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.