ठाणे - अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत होते, तेव्हा काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. सुशांतची बहीण आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीतील एका डॉक्टराकडून फेक डिस्क्रिप्शन तयार करून त्याला औषधे देत होते. त्या औषधांच्या माध्यमातून त्याला ड्रग्स दिले असल्याचा संशय आहे. त्याला अमली पदार्थांच्या आहारी करून त्याची मुंबईतील संपत्ती हडपण्याचा डाव कुटुंबीयाचा असल्याचेही काही जाणकारांचे म्हणणे. मात्र, या गोष्टीकडे कुणी लक्ष दिले नसल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
कुटुंबीयांनीच संपत्तीसाठी सुशांतला अमली पदार्थांचे व्यसन लावले नाही ना? याची चौकशी व्हायला पाहिजे. या अनुषंगाने देखील तपास झाला पाहिजे. पोलीस आयुक्त परवीरसिंग यांच्या देखील कानावर ही गोष्ट घातली असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सुशांत प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार, दीपेश सावंत, जैद विलात्रा आणि सैमुएल मिरांडा यांच्या न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.