ठाणे - 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला. मात्र, ठाण्यातील काही मल्टिप्लेक्सवाल्यांकडून या चित्रपटावर टॅक्स आकारला जात होता. ही बाब ठाण्यातील शिवसैनिकांना समजल्यानंतर ठाण्यातील कोरम आणि विव्हियाना मॉलमध्ये चालकांना जाब विचारला. तसेच तीव्र आंदोलन केले. त्यानंतर ठाण्यातील दोन्ही मॉलमधील मल्टीप्लेक्स चालकांना करमुक्त चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला.
शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपटाने सध्या करोडोंच्यावर कमाई केली आहे. अनेक राज्यात हा चित्रपट करमुक्त केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने देखील महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा चित्रपट करमुक्त दाखवण्यातही आला. मात्र, ठाण्यातील दोन मॉलमध्ये या चित्रपटावर कर आकारला. याच्या निषेधार्थ शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यानंतर हा चित्रपट त्वरित करमुक्त करण्यात आला.