ठाणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने नाका-बंदी, 24तास गस्तीचा पहारा सुरू आहे. मात्र, असे असताना देखील शहरात रिव्हॉल्वर हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शांतीनगर पोलिसांनी केली.
भिवंडी शहरातील चाविंद्रा हद्दीत शानदार मार्केटमध्ये जावेद शेठ यांचे कार्यालय असून त्या ठिकाणी काही जण संशयरित्या फिरत असल्याची माहिती असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून 5 दरोडेखोरांवर झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील 2 जणांना पकडण्यात यश आले. तर 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
शहजाद मोहम्मद अमीन शेख (वय, 21 राहणार. खंडू पाडा), मुस्ताक अहमद अन्सारी (वय 25, रा. अवचित पाडा) अशी पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी दरोडेखोराकडून गावठी कट्टा, एक दोरी, मिरची पूड आदी साहित्य जप्त केले आहेत. मात्र, या कारवाईत जुम्मन, पापा नाट्य, एक अनोळखी साथीदार असे 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. या घटनेचा शांती नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.